टोप (प्रतिनिधी) :  भादोले- लाटवडे रस्त्यावरील  स्मशानभूमीजवळ अंगावर काळसर रंगाचे मोठे ठिपके असलेले अजगर स्थानिक लोकांना आढळून आले. या अजगराची लांबी सुमारे ८ फूट इतकी आहे. परिसरात घबराटीचे वातावरण पसरले. नागरिकांनी त्वरित स्थानिक सर्पमित्र बाजीराव कमलाकर यांना ही माहिती दिली.

याबाबत कमलाकर यांनी वनविभागातील प्रदिप सुतार यांना  कळवले. त्यांनी सर्पमित्र किरण चौगुले, अमित पाटील, मौशीन यांच्या मदतीने घटनास्थळी जाऊन अजगरास पकडले. त्यानंतर नरंदे येथील वनपाल जाधव यांच्याशी संपर्क साधून वनविभागाच्या स्वाधीन केले.

दरम्यान, मुख्य वनसंरक्षक व्ही.क्लेमेंट बेन, उपवन संरक्षक काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या अजगराची डॉ. वाळवेकर यांच्याकडून वैद्यकीय तपासणी करून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.