करवीर (प्रतिनिधी) :  करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी मोठ्या चुरशीने आणि शांततेत मतदान झाले. गडमुडशिंगीमध्ये ७७.३५, तर न्यू वाडदे येथे ८६.७९ टक्के मतदान झाले. सतेज उर्फ बंटी पाटील ग्राम विकास आघाडी,  कै. शिवाजीराव कृष्णात पाटील सत्तारूढ शेतकरी सेवा आघाडी आणि बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत झाली.  

आज (शुक्रवार) सकाळी सात वाजता सहा प्रभागांसाठी मतदानाला सुरुवात झाली.  सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. मतदानासाठी मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. सत्ताधारी  कै. शिवाजीराव कृष्णात पाटील, शेतकरी सेवा आघाडीचे नेतृत्व तानाजी कृष्णात पाटील,  सतेज उर्फ बंटी पाटील ग्रामविकास आघाडीचे नेतृत्व डॉ. अशोकराव पाटील यांच्याकडे होते. आप्पासाहेब धनवडे, नंदकुमार गोंधळी आणि पोपट दांगट यांच्या संयुक्त नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी प्रथमच मैदानात उतरली होती. करवीर तालुक्याच्या पूर्वभागातील गडमुडशिंगी सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याने   मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

गडमुडशिंगी ग्रा.पं. निवडणूक —

एकूण मतदान १०,१६९

झालेले मतदान ७,८६६

टक्केवारी ७७.३५

न्यू वाडदे ग्रामपंचायत —

एकूण मतदान : ११२१

झालेले मतदान : ९७३

मतदानाची टक्केवारी : ८६.७९

प्रभागानुसार मतदानाची आकडेवारी —

प्रभाग क्रमांक एक –एकूण मतदान ३९७ झालेले मतदान (३६२), प्रभाग क्रमांक दोन -३७४ (३३८), प्रभाग क्रमांक तीन – ३५० (२७३), असे झाले आहे.