वाहन खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्याचे ७० हजार लंपास…

0
36

टोप (प्रतिनिधी) : जूनी चारचाकी माल वाहतूक गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याचे ७० हजार रुपयांची पिशवी हिसकावून अज्ञातांनी पलायन केले. चिंतामणी संजय मडीवाळ (वय ३१, रा. मजरेवाडी ता. शिरोळ) असे लुबाडणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना काल (सोमवार) दुपारी पूणे-बंगलूर राष्ट्रीय महामार्गालगत शिये फाटा, टोप येथे घडली.

‘ओएलएक्स’ या अॅपवरती अशोक लेलॅन्ड माल वाहतूक ट्रक विक्रीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती.‌ यामध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर मडीवाळ यांनी संपर्क साधला. त्या समीर नावाच्या व्यक्तीने आपण एजंट आहे. तुम्ही गाडी बघण्यासाठी श्रीराम फायनान्स कंपनीच्या शिये फाटा येथील गोडावूनजवळ या असे सांगितले. मडीवाळ शिये फाटा येथे आले तेव्हा तिघेजण वाट बघत थांबलेले होते.

त्यातील एकाने खांद्यावर हात ठेवून बोलत बाजूला नेले. तर सोबत असलेल्या दोघांनी सत्तर हजार रुपये असलेली बॅग हिसकावून पल्सर मोटर सायकल वरुन बेंगलोरच्या दिशेने पलायन केले. या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात झाली आहे. फौजदार अतुल लोखंडे पुढील तपास करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here