पिंपळगांवात ७० हजारांची घरफोडी…

0
222

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील पिंपळगांव येथील सागर लक्ष्मण पंडे (वय ३२) हे कामानिमित्य मुंबई येथे गेले होते. त्यांच्या घराची कडी-कोयंडा तोडून रोख रक्कम आणि सोन्याचांदीचे दागिणे असा ७० हजारांचा माल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. याबाबत भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा आज (गुरुवार) नोंद झाला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ३ जुलै रोजी सागर पंडे हे कामानिमित्य मुंबईला गेले होते. मुंबईहून १० जुलै रोजी आल्यानंतर त्यांना घरी चोरीचा प्रकार उघडकीस आला. या चोरीमध्ये चोरट्याने ४९,५०० रुपयांची रोख रक्कम, सोन्याच्या दोन बुगड्या, लहान मुलांच्या गळ्यातील दोन लॉकेट, मंगळसुत्रातील लिखलिखी, कानातील एक रिंग असा सर्व मिळून पाऊण तोळा वजनाचे सोने,  चांदीच्या दोन मासोळ्या,  लहान मुलांचे दोन करदोडे असा ७० हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला आहे.

या घटनेचा तपास भुदरगडचे पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सतीश मयेकर, पोलीस संदेश कांबळे, मनिषा मुगडे करीत आहेत.