जम्मू : जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या चंदनबाडीमध्ये आयटीबीच्या जवानांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून अनेक जवान शहीद झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे ती अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. प्राथमिक माहितीत या दुर्घटनेत ७ जवान ठार झाले आहेत.

घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस दलाचे ३७ आणि जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे दोन असे ३९ जण प्रवास करत होते. त्यावेळी अचानक पहलगाममधील फ्रिसलन येथे बस दरीत कोसळली. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जवान तैनात करण्यात येणार होते. त्यासाठी या सर्व जवानांना घेऊन ही बस पहलगामहून चंदनवाडी येथे निघाली होती. त्यावेळी अचानक फ्रिसलन येथे बस २०० फूट दरीत कोसळली.