भारताच्या ७ बॅडमिंटन खेळाडुंना कोरोनाची लागण

0
17

नवी दिल्ली  (प्रतिनिधी) : भारताच्या ७  बॅडमिंटन खेळाडुंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे हे खेळाडू  इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत खेळणार नाहीत. या खेळाडूंमध्ये किदाम्बी श्रीकांत, रितिका ठक्कर, अश्विनी पोनप्पा, त्रिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन सिंग आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे.

बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ७ भारतीय खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. मात्र, कोरोनाची लागण झालेल्या खेळाडूंची नावं उघड केलेली नाहीत. सात खेळाडूंच्या संपर्कात आलेल्या दोन जोड्यांनाही स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले आहे. दरम्यान प्रतिस्पर्ध्यांना पुढील फेरीत वॉकओव्हर दिले जाणार आहे.

टूर्नामेंट सुरु होण्यापूर्वीच बी साई प्रणीत, मनू अत्री आणि ध्रुव रावत यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले  होते. त्यामुळे  स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला होता.