जिल्ह्यात चोवीस तासात ६१३ जण कोरोना पॉझिटिव्ह…

0
167

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात ६१३ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १६ जणांचे मृत्यू झाले असून ९४८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र १३०, आजरा – १३, भुदरगड – २, चंदगड- ३, गडहिंग्लज- २३, गगनबावडा – ५, हातकणंगले – ७६, कागल – ४३करवीर- ८३, पन्हाळा – ५४, राधानगरी – ९, शाहूवाडी – ३०, शिरोळ – ५७, नगरपरिषद क्षेत्र ७७, इतर जिल्हा व राज्यातील – ८ अशा ६१३ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –

एकूण रुग्ण – १, ९५, ५२६ 

डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ८४, ४६१

मृतांची संख्या – ५, ४९८

उपचार सुरू असलेले रुग्ण – ५, ५६७