आजरा तालुक्यात ६ जणांना कोरोनाची लागण…

0
379

आजरा (प्रतिनिधी) : आजरा तालुक्यात आज (सोमवार) ६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पुन्हा परिस्थिती धोक्याबाहेर जात आहे. नागरिकांनी नियमांचे पालन कडक केले नाही तर पुन्हा लॉकडाऊन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामध्ये आजरा शहरातील २ जण बाधित असून सर्वोदय नगर मधील ४७ वर्षीय पुरुष आणि ३६ वर्षीय स्त्रीचा समावेश आहे. तर तालुक्यातील गवसे येथील २१ वर्षीय पुरुष, कोवाडे येथील ३७ वर्षीय पुरुष, हारूर ५८ वर्षीय पुरुष तर लाकुडवाडीत ६५ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.