शिरोळ तालुक्यात पहिल्या दिवशी सरपंचपदासाठी ६ अर्ज

0
127

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून गावा- गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आज सोमवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सरपंचपदासाठी ६ अर्ज, तर सदस्यपदासाठी ४ अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान, इच्छुक उमेदवारांनी चांगल्या दिवसाबरोबरच मुहूर्त शोधण्यासाठी धडपड सुरू केली असल्याचे दिसते. येत्या २ डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.

शिरोळ तालुक्यातील कवठेसार, उमळवाड, संभाजीपूर, चिंचवाड, कनवाड, हरोली, टाकवडे, अब्दुललाट, शिवनाकवाडी, लाटवाडी, हेरवाड, आकिवाट, औरवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, नवे दानवाड या १७ ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. आज अर्ज भरण्याच्या सोमवारी पहिल्या दिवशी राजापूर, नवे दानवाड, अब्दुललाट, कनवाड व औरवाड या गावातून सरपंच व सदस्यपदासाठी एकूण १० अर्ज दाखल करण्यात आले आहेत.