कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात मागील चोवीस तासात ३९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात मृत्यू निरंक झाले असून ५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र – १६, आजरा – ०, भुदरगड – १, चंदगड – १, गडहिंग्लज – ३, गगनबावडा – ०, हातकणंगले – ४, कागल – १, करवीर – ४, पन्हाळा – ०, राधानगरी – १, शाहूवाडी – ४, शिरोळ – ०, नगरपरिषद क्षेत्र – ४ इतर जिल्हा व राज्यातील – ३ अशा ३९ जणांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील आजअखेरची स्थिती –
एकूण रुग्ण – २, ०६, ०४९
डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या – १, ९९, ८२६
मृतांची संख्या – ५, ७७३
उपचार सुरू असलेले रुग्ण – ४५०