कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ५१ जणांना कोरोनाची लागण

0
153

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ५१ जणांना कोरोनाची लागण झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आज (सोमवार) दिवसभरात ४२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ४१६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील २७, हातकणंगले तालुक्यातील ५, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील ४, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ११ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा ५१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील एका ६५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५१,३३८.

डिस्चार्ज – ४९,०५९.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ५२२.

मृत्यू – १७५७.