नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस : श्री जोतिबाची सोहन कमळ पुष्पातील महापूजा

0
94

वाडी रत्नागिरी (प्रतिनिधी) : नवरात्रोत्सवाच्या चौथ्या दिवशी आज (मंगळवार) जोतिबा डोंगर येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाची नवरात्री सोहन कमळ पुष्पातील अलंकारिक महापूजा तसेच आदिमाता श्री चोपडाई देवीची अलंकारिक सोहन कमळ पुष्पातील महापूजा बांधण्यात आली. यामध्ये श्री जोतिबादेवाची पूजा पुजारी महादेव झुगर (गावकर), प्रकाश सांगळे, दगडू भंडारी, संदीप उपारे, आदिनाथ लादे यांनी साकारली.

तर आदिमाता श्री चोपडाई देवीची अलंकारिक महापूजा पुजारी सचिन ठाकरे, ओंकार लादे, सूरज ठाकरे यांनी साकारली.