मुरगूड (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने लाल आखाडा व्यायाम मंडळ मुरगूड यांच्यावतीने गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह वि. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय मॅटवरील ‘लाल आखाडा चषक’ भव्य कुस्ती स्पर्धेत विविध वजनी गटात ४९० मल्लांंनी सहभाग घेतला. यामध्ये खुल्या गटात राजभरातून ५५ मल्ल सहभागी झाले असूून, लाल आखाडा चषकासाठी लढणार आहेत.

या स्पर्धेेचे उद्घाटन गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके यांच्या हस्ते, तर बिद्रीचे संचालक बाबासो पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. वजन काट्याचे पूजन सखाराम डेळेकर, मोहन गुजर, बजरंग सोनुले, एकनाथ बरकाळे, अशोक खंडागळे, बाजीराव चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आले. दीप प्रज्वलन गोकुळचे माजी संचालक दिनकरराव कांबळे, प्रतिमापूजन बिद्रीचे माजी उपाध्यक्ष सुनीलराज सूर्यवंशी व ध्वजारोहण गोकुळचे संचालक पंडितराव केणे, मॅटचे पूूजन बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी चेतन नरके, बाळासो पाटील, भीमा साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांची भाषणे झाली. भीमा साखरच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल विश्वराज महाडिक यांचा रणजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास  बाळासो पाटील, विश्वजित पाटील, पद्मसिंह पाटील, संभाजी वरूटे, संजय पाटील, श्रीरंग पाटील, आनंदा मांगले, सदाशिव मेंडके, विलास गुरव, अमर चौगले, के. डी. मेंडके, अ प्रकाश भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या कुस्तीसाठी राजाराम चौगले, प्रकाश खोत, बापू लोखंडे, बटू जाधव, बाळू मेटकर, सिकंदर कांबळे, रवींद्र पाटील, महेश जाधव हे पंच म्हणून काम पाहणार आहेत.

आज झालेल्या कुस्तीमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करीत अक्षय साळवी (बानगे) प्रशांत मांगोरे, कुलदीप पाटील (राशिवडे), रणजित भारमल (मुरगूड), अमोल बोंगार्डे (बानगे), सुदर्शन पाटील, हर्षद रावळ, युवराज कामन्ना, रितेश मगदूम, ओम हसबे, अभिनव पवार या मल्लांनी विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला.