आचारसंहिता लागू झाल्यापासून ४७७ गुन्ह्यांची नोंद…

अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी

0 53

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात काटेकोर पद्धतीने निवडणूक आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे. राज्यभरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरु आहे. तरी आतापर्यंत ४७७ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार १६ गुन्हे दाखल करण्यात आले असून, अंमली पदार्थ बाळगणे, विक्रीसाठी वाहतूक करणे आदी स्वरुपाच्या ७८ प्रकरणात एनपीडीएस अधिनियमानुसार कारवाई करण्यात आली आहे. स्फोटके कायद्यानुसार ३ प्रकरणात, महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत २३४ प्रकरणात, मालमत्तेचे विद्रुपीकरण अधिनियमांतर्गत २५ प्रकरणात तर अन्य विविध अधिनिमांतर्गत ८ प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.

शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांतता, सुरक्षितता भंग करणे, बेकायदेशीररित्या जमाव करणे, तलवारी, बंदुका आदी शस्त्रे, स्फोटक पदार्थ बाळगणे आदी स्वरुपाच्या प्रकरणात भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार ११३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More