जिल्ह्यात मागील चोवीस तासात ४७३ नव्या कोरोनाबाधितांची भर ; ६३२ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल (सोमवार) सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ४७३ जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ६३२ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच २३४१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ८ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार, गेल्या चोवीस तासात शहरातील १०६, आजरा तालुक्यातील २, भूदरगड तालुक्यातील ४४, चंदगड तालुक्यातील १५, गडहिंग्लज तालुक्यातील १६, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ३०, कागल तालुक्यातील २९, करवीर तालुक्यातील ५६, पन्हाळा तालुक्यातील ४३, राधानगरी तालुक्यातील ६, शाहूवाडी तालुक्यातील ६, शिरोळ तालुक्यातील ३४,  इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ७६ आणि जिल्ह्यातील इतर ९ अशा एकूण ४७३ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ६३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय तब्बल २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या : ४०,७३५.

एकूण डिस्चार्ज : २९,२३४.

उपचारासाठी दाखल रुग्ण : १०,१९६.

एकूण मृत्यू : १३०५.

Live Marathi News

Recent Posts

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी होणार मुख्यमंत्री..?

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे राज्यपाल…

1 hour ago

अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या विरोधकांना शिवसेनेचे प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातील महाविकास आघाडी…

3 hours ago

कागल पं. स. तर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त…

16 hours ago