कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ४६० जण कोरोनाबाधित : १२ जणांचा बळी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (रविवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या चोवीस तासात ४६०  जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, दिवसभरात ४२७ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ११२९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज रात्री ८ वा.प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ११३,आजरा तालुक्यातील १४,   भूदरगड तालुक्यातील ४, चंदगड तालुक्यातील १३, गडहिंग्लज तालुक्यातील ३१, गगनबावडा तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील ३३, कागल तालुक्यातील १३, करवीर तालुक्यातील ५२, पन्हाळा तालुक्यातील १८, राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील ९, शिरोळ तालुक्यातील ६, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६० आणि इतर जिल्ह्यातील ९० अशा एकूण ४६० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर ४२७ जण कोरोनामुक्त झालेतं.

दरम्यान, कोल्हापूर शहरातील फुलेवाडी येथील १, राजारामपूरी उद्यमनगर येथील १, गंगावेश १, पन्हाळा तालुक्यातील आवळी येथील १, भुदरगड तालुक्यातील कूर येथील १, इचलकरंजी परिसरातील यशवंत कॉलनी येथील १, जाधव मळा येथील १,जवाहर नगर येथील १,करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील १, गडहिंग्लज मधील १ आणि वाळवा तालुक्यातील इस्लामंपूर येथील १,सांगली जिल्ह्यातील १ अशा १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४३,४४३.

एकूण डिस्चार्ज ३२,३१५.

सध्या उपचारासाठी दाखल रुग्ण ९७५३.

तर आजअखेर कोरोनामुळे १३७५ जणांचा मृत्यू झाला आहे.

Live Marathi News

Recent Posts

…तर शरद पवारांच्या घरावर मोर्चा ! – मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

नाशिक (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून…

14 hours ago

जिल्ह्यातील लॉकडाऊनची मुदत पुन्हा वाढली…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हयामध्ये लॉकडाऊनची मुदत…

14 hours ago

कळे येथील शिबिरात १४० जणांचे रक्तदान

कळे (प्रतिनिधी) : मुंबईवर २६ जानेवारी…

15 hours ago