कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज (रविवार) कोविशिल्डचे सुमारे ४५ हजार डोस उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

यामध्ये आजरा तालुक्यासाठी १ हजार ७१०, भुदरगड तालुक्यासाठी १ हजार ८९०, चंदगड तालुक्यासाठी २ हजार ५६०, गडहिंग्लज तालुक्यासाठी ३ हजार २८०, गगनबावडा तालुक्यासाठी ५००, हातकणंगले तालुक्यासाठी ९ हजार २००, कागल तालुक्यासाठी २ हजार ५८०, करवीर तालुक्यासाठी ४ हजार ५६०, पन्हाळा तालुक्यासाठी २ हजार ६४०, राधानगरी तालुक्यासाठी २ हजार ६६०, शाहूवाडी तालुक्यासाठी २ हजार ९२०  तर  शिरोळ तालुक्यासाठी ४ हजार १६० डोस प्राप्त झाले आहेत. तर सीपीआर रूग्णालयासाठी ३४०, सेवा रूग्णालय, (कसबा बावडा) ५०० तर कोल्हापूर महानगरपालिका ५ हजार ५०० असे एकूण ४५ हजार डोस प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

४५ वर्षावरील नागरिकांना दुसरा डोस प्राधान्याने देण्यासाठी तालुकानिहाय आवश्यकतेनुसार लसीचा कोटा ठरविण्यात आला आहे. संबंधितांनी लस घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे .