आजरा (प्रतिनिधी) : आजरा-आंबोली मार्गावर तुलसी धब्यानाजीक आज सायंकाळी आजरा पोलिसांनी कारवाई करत गोवा बनावटीची एका टेम्पोंसहीत ४ लाख ७० हजार किंमतीचे मद्य जप्त केले. यामध्ये शिवाजी ग्यानबा भुते आणि गणेश महादेव पिंगळे हे दोघे (रा. खर्डा ता. जामखेड, जि. अहमदनगर) यांना आजरा पोलिसांनी अटक केली आहे. तसेच टेम्पो (एमएच ४२ बी ९८७३) हा जप्त करण्यात आला आहे.

आजरा-आंबोली मार्गावर गवसे गावानजीक तुलसी धाबा आहे. याठिकाणी पोलीसांची गस्त सुरु असता एका टेम्पोवर संशय आल्याने त्याची तपासणी केली. यावेळी या टेम्पोच्या हौद्यात गोवा बनावटीची ४लाख ७० हजारांचे अवैध मद्य सापडले. ही कारवाई आजरा पो नि. बालाजी भांगे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.