कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून इथल्या डॉक्टरांसहीत वैद्यकीय महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांना असे ३७ कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांचा आधारवड असलेल्या सीपीआरमध्येच वैद्यकीय पथकच बाधित झाल्यानं खळबळ उडाली आहे.

तसेच या डॉक्टरांच्या आणि विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी सुरु झाल्याचे सांगण्यात आले. यामध्ये बाधितांना सौम्य लक्षणे दिसून आली असून त्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत. मात्र, सीपीआरमधील रुग्णांची सेवा अखंडीत आणि सुरळीत सुरु आहे.