सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्याच्या डोंगरी भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न निकालात काढण्यासाठी केकतवाडी गावाच्या नळपाणी पुरवठा योजनेसाठी राष्‍ट्रीय पेयजल योजनेतून ३५ लाख ८० हजार रुपये मंजूर झाले असल्याची माहिती करवीर पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य  राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली.

या योजनेसाठी निधी मंजूर करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. यशवंत बँकेचे माजी संचालक नंदकुमार पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आ. पी. एन. पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून नळ योजनेस पाठबळ मिळाले असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. जि. प. सदस्य सुभाष सातपुते म्हणाले की, डोंगरी भागात पाणी योजना राबविल्याने जनतेचे हाल थांबतील. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे.

सरपंच पंढरीनाथ नलवडे यांनी या कामासाठी राजेंद्र सूर्यवंशी यांनी प्रयत्न केल्यामुळे निधी मंजूर झाला आहे. ते या योजनेचे  शिल्पकार आहेत असे गौरवोदगार काढले. या वेळी रयत संघाचे संचालक  सचिन पाटील, नंदकुमार पाटील, कृष्णात ढोक यांचीही भाषणे झाली.