जिल्ह्यात चोवीस तासात ४१ जण कोरोनामुक्त…

0
82

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (शनिवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ३६ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ७३९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ७ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ९, आजरा तालुक्यातील २,  चंदगड तालुक्यातील ४,  गडहिंग्लज तालुक्यातील ५, हातकणंगले तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २, पन्हाळा तालुक्यातील ५, राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील ३ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण ३६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर आजरा तालुक्यातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,४४४.

एकूण डिस्चार्ज : ४६,०५५

उपचारासाठी दाखल रुग्ण : ७३४

एकूण मृत्यू : १६५५