कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ३२ जणांना कोरोनाची लागण

0
85

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात आज (गुरुवार) ३२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात ४० जणांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच ५९१ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १३, गडहिंग्लज तालुक्यातील २, हातकणंगले तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर जिल्ह्यातील ७ अशा ३२ जणांना कोरोनाच लागण झाली आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,७७३.

डिस्चार्ज – ४८,७२८.

उपचारासाठी दाखल रुग्ण – २९६.

मृत्यू – १७४९.