कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ३० जणांना कोरोनाची लागण

0
191

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ३० जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आज (रविवार) दिवसभरात ४१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. १,०७७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १७, भूदरगड तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ६ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा ३० जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

 एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५०,६६४.

 डिस्चार्ज – ४८,५५७.

 उपचारासाठी दाखल रुग्ण – ३६१.

 मृत्यू – १७४६.