खा. धनंजय महाडिक, माजी आम. अमल महाडिक यांच्या प्रयत्नांना यश
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक व माजी आमदार अमल महाडिक यांनी पाठपुरावा केलेल्या विविध रस्त्यांच्या कामासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या योजनांच्या माध्यमातून 30 कोटी 60 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर हातकणंगले व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांच्या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
विविध रस्ते आणि मंजूर निधी
1) प्रजिमा-96 तासगाव ते सिधोबा देवालय ते रामा 192 (2.80 किमी), 2) प्रजिमा-96 भेंडवडे ते इजिमा-31 अप्रोच रस्ता (3.20 किमी), 3) ग्रामा-14 कुंभोज ते सकलतपीर नरंदे रस्ता (3.30 किमी), 4) रामा-194 रुकडी ते वसगडे नदी रस्ता (2.20 किमी), 5) रामा-194 रुकड़ी ते पट्टणकोडोली रस्ता (2 किमी), 6) राममा-166 चोकाक ते रुकडी रस्ता (2.50 किमी).
7) कोल्हापूर शहर ते हणमंतवाडी, शिंगणापूर इजिमा 69 रस्ता (4.10 किमी), 8) निगवे दुमाला ते ग्रामा-12 ट्रेनिंग कॉलेज ग्रामा-10 रस्ता (2.70 किमी), 9) एसएच 94 ते कावणे रस्ता (2 किमी), 10) एनएच 04 उचगाव ते मुडशिंगी रस्ता (2.60 किमी), 11) चिंचवाड जैन मंदिर ते वळीवडे रस्ता (2.20 किमी), 12) इजिमा-74 ते आर.के. नगर (ग्रामा-49) रस्ता (1 किमी), 13) गोकुळ शिरगाव ते चित्रनगरी रस्ता (2.20 किमी), 14) दऱ्याचे वडगांव ते वड्डवाडी रस्ता (2 किमी), 15) वसगडे ते रुकडी रस्ता (1.80किमी), 16) एनएच 04 ते कणेरीवाडी (इजिमा – 72) रस्ता (1.70 किमी), 17) ग्रामा क्र. 101 पासून वसगडे हायस्कूल ते इजिमा-77 ला मिळणारा रस्ता (2.50 किमी) इत्यादी रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शहर व ग्रामीण भाग जोडणारे व ग्रामीण भागातील विविध गावे जोडणाऱ्या नवीन रस्त्यांच्या कामासाठी तसेच दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीसाठी 30 कोटींपेक्षा अधिकचा निधी मंजूर करण्यात आल्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील दळणवळणाला चालना मिळून जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे.