अकिवाट येथील ३ उदमांजरांना सुरक्षितस्थळी सोडले

0
228

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अकिवाट येथील कागे वेस परिसरात  अमर सौन्दत्ते यांच्या घराजवळ ३ उदमांजर आढळून आले. हेल्पिंग हॅन्ड अनिमल्स रेस्क्यू फोर्सच्या सदस्यांनी  ३ उदमांजर ताब्यात घेतले.

त्यानंतर  प्राणीमित्र युनूस मणेर यांनी याची माहिती वन विभागाचे घनशाम भोसले, डॉ संतोष वाळवेकर, गजानन सकट, अमित कुंभार यांना दिली. या उदमांजरांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. यावेळी हेलपिंग हॅन्ड रेस्क्यू फोर्सचे सर्पमित्र श्रेयश धुमाळे,  विश्वनाथ राजपूत,  इम्तियाज मकानदार आदी उपस्थित होते.