कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २८८ जणांना कोरोनाची लागण झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (बुधवार) दिवसभरात ८९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  १,२३२ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १२७, आजरा तालुक्यातील ९, भुदरगड तालुक्यातील १२, गडहिंग्लज तालुक्यातील ११, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १३, कागल तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २४, पन्हाळा तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील २, शिरोळ तालुक्यातील १६, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ४१ आणि इतर जिल्ह्यातील २७ अशा २८८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

तसेच कोल्हापुरातील कसबा बावडा येथील १, जरगनगर येथील १, करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथील १ आणि मोरेवाडी येथील १ अशा चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५३,२७३.

डिस्चार्ज – ५००११.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १४६४.

मृत्यू – १७९८.