कोल्हापूर  (प्रतिनिधी)  :  कोल्हापूर जिल्ह्यात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा महापूर  आला होता. या महापुरात शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते. दरम्यान, नुकसान ग्रस्तांसाठी २८१ कोटी ८० लाख ८६ हजार इतका निधी प्राप्त झाला आहे,  अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.

यामध्ये मयत व्यक्तींसाठी २४  लाख सानुग्रह अनुदानासाठी ७४ कोटी ५६ लाख, मयत जनावरांसाठी ४० लाख,  घर व गोठा पडझडसाठी ४५  कोटी ९८ लाख, हस्तकला कारागीर नुकसानीसाठी ६ कोटी २५  लाख, शेतीपिके नुकसानीसाठी ८५  कोटी ७० लाख, जमीन खरडून जाणे ३  कोटी ३० लाख, दुकानदार ५२  कोटी २८  लाख,  टपरीधारक १ कोटी ६६ लाख, मत्स्य नुकसानीसाठी ९ कोटी, इतका निधी प्राप्त झाला आहे.  मागणी प्रमाणे सर्व निधी शासना कडून प्राप्त झाला आहे. निधी वाटप प्रक्रिया या महिन्या अखेर पूर्ण  होईल,  असेही जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.