कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात २७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर आज (शुक्रवार) दिवसभरात ८० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर २,६०३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील १३७, आजरा तालुक्यातील २, भुदरगड तालुक्यातील ६, चंदगड तालुक्यातील ४, गगनबावडा तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १४, करवीर तालुक्यातील १७, पन्हाळा तालुक्यातील ६, राधानगरी तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील ३, शिरोळ तालुक्यातील १६, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील ५१ आणि इतर जिल्ह्यातील १८ अशा २७७ जणांना कोरोनाच लागण झाली आहे. तसेच इचलकरंजीमधील ६४ वर्षीय महिला आणि कोल्हापूरातील जाधववाडी येथील ४५ वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ५३,७१७.

डिस्चार्ज – ५०,१८०.

उपचारासाठी दाखल रुग्ण – १७३५

मृत्यू – १८०२.