शिरोळ तालुक्यातील २६ गावांचे सरपंचपद खुल्या गटासाठी आरक्षित

0
113

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील ५२ ग्रामपंचायती ३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. कोणत्या प्रवर्गातील आरक्षण निघेल याची कल्पना नसलेमुळे प्रत्येक गावातील गट तट व आघाड्यांना उमेदवार रिंगणात उतरवताना त्या त्या आरक्षणाचा उमेदवार काढत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. अद्याप १९ ग्रामपंचायतीची निवडणूक बाकी आहे. असे असले, तरी आज (बुधवार) सर्व गावांसाठी सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे. आता तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये सरपंच पदासाठी रस्सीखेच होणार आहे. ५२ पैकी निम्म्या म्हणजे २६ गावांचे सरपंचपद खुल्या गटासाठी आरक्षित झाले आहे.

तालुक्यातील तमदलगे, मजरेवाडी, नृसिंहवाडी, नांदणी, निमशिरगाव, हसुर, कुटवाड, गौरवाड, गणेशवाडी, टाकळीवाडी, शिरदवाड, शिरटी, कोंडिग्रे, यड्राव, चिपरी, दानोळी, जांभळी, कवठेगुलंद, बुबनाळ, उदगाव,  शेडशाळ, जैनापूर, घोसरवाड, बस्तवाड, धरणगुत्ती, शिरढोण, कोथळी, दत्तवाड, आलास, अर्जुनवाड, घालवाड,  तेरवाड अशा ३३ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे.

अनुसुचित जाती – ५ जागा – नांदणी, संभाजीपूर, कुटवाड, दत्तवाड, चिंचवाड.

अनुसूचित जाती महिला – ५ जागा – टाकळीवाडी, धरणगुत्ती, हेरवाड, राजापूर, जैनापूर.

अनुसूचित जमाती एक जागा – राजापूरवाडी.

अनुसुचित जमाती महिला एक जागा – घोसरवाड (जागा रिक्त)

नागरिकांचा मागास प्रवर्ग ७ जागा – जांभळी, निमशिरगांव, हरोली, नृसिंहवाडी, कनवाड, कोंडीगे्र, तमदलगे.

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ७ जागा – आगर, चिपरी, गौरवाड, टाकळी, मजरेवाडी, दानोळी, शिरदवाड.

सर्वसाधारण एकूण १३ जागा – कवठेसार, कोथळी, उदगाव, घालवाड, यड्राव, बस्तवाड, शेडशाळ, गणेशवाडी, आलास, लाटवाडी, औरवाड, नवे दानवाड, शिरढोण.

सर्वसाधारण महिला १३ जागा – अर्जुनवाड, शिरटी, हसूर, अब्दुललाट, तेरवाड, कवठेगुलंद, बुबनाळ, खिद्रापूर, उमळवाड, टाकवडे, शिवनाकवाडी, अकिवाट, जुने दानवाड.