गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी कोव्हिड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे या सेंटरचे वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन सुतार यांनी सांगितले.

आजरा, राधानगरी, भुदरगड, कागल, मुरगूड परिसरातील संशयीत कोरोना रुग्ण गारगोटी कोविड सेंटरला दाखल करण्यात आले आहेत. काल ४४ स्वॅब पाठवण्यात आले होते. त्यातील ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आज २२ स्वॅब पाठवले असून त्याचा रिपोर्ट अद्याप येणे आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रिपोर्टमध्ये भुदरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुक येथील २, आनफ ४, देवर्डे १, मेघोली १, आरळगुंडी १, गारगोटी ३, पारधेवाडी १, आदमापूर १, सोनारवाडी १ अशा १४ रुग्णांचा समावेश आहे.

आजरा तालुक्यातील निंगुडगे येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह  आली आहे. मुरगूड येथील ३ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.