२६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधाराला अटक

0
138

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवाद्यांना मदत करणे आणि त्यांना फंडिंग केल्याप्रकरणी २६/११ मुंबई हल्ल्याचा सुत्रधार आणि ‘लष्कर-ए-तोयबा’चा दहशतवादी जकीउर रहमान लखवी याला आज (शनिवार) अटक करण्यात आली. पाकिस्तानातून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. जकीउर रहमान लखवीने हाफीज सईदसोबत मिळून २६/११ च्या हल्ल्याचा कट आखला होता.  

लखवीला मुंबई हल्ल्यानंतर २००८ मध्ये संयुक्त राष्ट्रांद्वारे जागतिक दहशतवादी म्हणून घोषीत केले होते. लखवीनेच हाफीज सईदला दहशतवादी हल्ल्याची संपूर्ण योजना आखून दिल्याचे तपासातून उघड झाले होते.

मुंबई शहरात लष्कर-ए-तोयबाच्या १० सशस्त्र दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १६६ लोकांचा बळी केला होता. तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. सुमारे ६ वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर एप्रिल २०१५ रोजी लष्करचा ऑपरेशन कमांडर लखवीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका झाली होती.