कोल्हापूर  (प्रतिनिधी) : नॅशनल टेस्टींग एजन्सीमार्फत घेण्यात आलेल्या जेईई मेन्स २०२१ या चारही परीक्षांचा अंतिम निकाल नुकता वेबसाईटवर जाहीर झाला. या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या चाटे क्लासेस चाटे आयआयटी-नीट सेंटर व ज्युनियर कॉलेजचे २५३ विद्यार्थी जेईई अॅडव्हानासाठी पात्र ठरले. या परीक्षेमध्ये राष्ट्रीय पातळीवरील निकषानुसार  समुहाच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळविले आहे, असे प्रतिपादन चाटे शिक्षण समुहाचे कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी केले.

या परीक्षेमधून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी जेईई अॅडव्हान्स ही परीक्षा ३ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेसंबंधी अधिकची माहिती आणि मार्गदर्शनासाठी चाटे शिक्षण समुहाच्या शाखेवर विद्यार्थ्यांनी भेट द्यावी, असे आवाहन  चाटे व्यवस्थापनातर्फे केले आहे.

‘जेईई अॅडव्हान्स २०२१’ साठी पात्र ठरलेले चाटे शिक्षण समुहाचे काही विशेष गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे –  अश्विन तरस (९९.१६ एनटीए स्कोर),  पुष्कराज पोवार (९९.०५ एनटीए स्कोर),  अनुरूप शेणवी (९८.७३ एनटीए स्कोर),  राजवर्धन पाटील (९५.६२ एनटीए स्कोर),  अबार बैरागदार (९५.२२ एनटीए स्कोर), प्रतिक फाळके (९४.८५ एनटीए स्कोर), संकेत पाटील (९४.७९ एनटीए स्कोर),  हर्षवर्धन (९४.७३ एनटीए स्कोर), साहिल शेटे (९४.५५) एनटीए स्कोर), आशुतोष गायकवाड (९४.१२ एनटीए स्कोर), अभिषेक पाटील (९४.०० एनटीए स्कोर), शुभम सिंग (९३.९७ एनटीए स्कोर),   राजलक्ष्मी पाटील (९३.८८ एनटीए स्कोर),  प्रज्ञा कुंभार (९३.४४ एनटीए स्कोर),  प्रसाद कर (९३.०१ एनटीए स्कोर), हरीका चौधरी (९१.८३ एनटीए स्कोर), विशाल शेळके (९१.३२ एनटीए स्कोर) ,  शुभम फाळके (९१.१२ एनटीए स्कोर),  रिशील पटेल (९०.६१ एनटीए स्कोर)

चाटे शिक्षण सहअध्यक्ष प्रा. मच्छिंद्र चाटे व प्रा. गोपीचंद चाटे, संचालक प्रा. डॉ. भारत  खराटे, प्राचार्य, प्राध्यापक, शाखा व्यवस्थापक,  शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  यशाबद्दल  विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.