कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासात २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच ६९१ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

कोल्हापूर शहर १६, आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील ३,राधानगरी तालुक्यातील १, इचलकरंजीसह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा २५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आजरा तालुक्यातील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना बाधित रुग्ण – ४९,६८९.

डिस्चार्ज – ४७,९२९.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ४८.

मृत्यू – १७१२.