उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून २५ जण ठार

0
21

उत्तराखंड : पौरी गढवाल जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एक बस ५०० मीटर खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात २५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत आत्तापर्यंत २१ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ज्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

हरिद्वार जिल्ह्यातील लालधंग येथील काटेवाड गावातून कांडा तल्लाला जाणारी बस लॅन्सडाऊनच्या सिमडी गावाजवळ सुमारे ५०० मीटर खोल दरीत कोसळली. ही बस वऱ्हाड्यांसह हरिद्वारमधील लालधंग येथून कारागावकडे जात होती. सिमडी गावाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळून हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

आत्तापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमध्ये सुमारे ४५ जण होते. पट्टा तुटल्यामुळे बसचे नियंत्रण सुटले आणि दरीत कोसळ्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मदतकार्य केले. अंधारामुळे मोबाईल टॉर्चने मृतदेह आणि जखमींचा शोध घेण्यात आला.

बिरोंखाल आरोग्य केंद्रातील पाच डॉक्टरांचे पथक घटनास्थळी झाले होते. रात्री एकच्या सुमारास उत्तराखंड पोलिसांनी सांगितले की, ‘९ जणांची सुटका करण्यात आली आहे. ६ जखमींना बिरोखाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तबचावलेल्या २ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. अंधारामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. बुधवारी सकाळपर्यंत उर्वरित लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.