कोल्हापूर (प्रतिनिधी) : अभियांत्रिक औषध निर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२१ परीक्षेचा निकाल नुकताच बेवसाईटवर जाहीर झाला. या परीक्षेत चाटे शिक्षण समुहाच्या निकी अगरवालने पीसीबीमध्ये ९९.९५ पर्सेटाईल आणि इंद्रजित शेळके, आदित्य बांगर यांनी पीसीएममध्ये ९९.९३ पर्सेंटाईल गुण मिळवून समुहात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्यामुळे चाटे ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स, कोचिंग क्लासेस व आयआयटी-नीट अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण राज्यात एमएचटी-सीईटीच्या परीक्षेत यश संपादन करून विक्रम केला आहे.

समुहाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी सांगितले की, या परीक्षा विद्यार्थ्याच्या करिअरची दिशा ठरविणारी असल्यामुळे या परीक्षेला अनन्यसाधारण महत्व आहे. या परीक्षेत २४ विद्यार्थ्यांनी ९९ पर्सेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळविले. तर ९९ ते ९० या दरम्यान पर्सेंटाईल मिळविणाऱ्या चाटे शिक्षण समूह, कोल्हापूर विभागातील विद्यार्थ्यांची संख्या २९३ इतकी आहे. चाटे शिक्षण समुहाच्या विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी चाटे समुहाच्या उज्वल यशाची परंपरा कायम राखली असून कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग य सोलापूर जिल्ह्यातील विद्यार्थी-पालकांनी चाटे शिक्षण समुहावर दाखविलेला विश्वास आमची जबाबदारी वाढवत असल्याचे सांगितले.

‘एमएचटी-सीईटी’ २०२१ परीक्षेमधील कोल्हापूर विभागातील ९७ पसेंटाईल पेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी असे…

निकी अगरवाल (९९.९५), इंद्रजित शेळके (९९.९३), आदित्य बांगर (९९.९३), रविराज पाटील (९९.८९), पुष्कराज पवार (९९.८६), आयमन शेख (९९.८५), संजना जाधव (९९.८३), किशनलाल चौधरी (९९.८२), सुमित सुनके (९९.७७), अनि तरस (९९.६७), सायली पाटील (९९.६२), साहोल जाधव (९९.५६), सोयल चंदकावते (९९.५३), ओम पाटील (९९.४५), अथर्व लिटके (९९.३१), अखार बैरागदार (९९.२५), शोएब सुतार (९९.२०), वेदांत वाप (९९.२०), प्रथमेश पोकर्णेकर (९९.१३), अक्षतामाळी (९९.१०), अभिनी माचे (९९.०६), अधिनी गुजर (९९.०३) देता मगदूम (९९.०२), प्रमिलाराजे काशीद (९९.०१), नम्रता रेंदाळे (९८.९९), गौरी कळी (९८.९६), आदिती पाटील (९८.९२), आकांक्षा पडशी (९८.८८), मयुरी निर्मळ (९८.७३), ऋषिकेश जावळे (९८.७२), निखिल पाटील (९८.७१),

क्षितीजा धुमाळ (९८.६०), राजवर्धन पाटील (९८,४७), सेता गावडे (९८.४०), ऋतुजा देसाई (९८.२८), मेघराज सुर्वे (९८.२४), श्रद्धा कुलकर्णी (९८.२३), मानसी पाटील (९८.१८), राजवर्धन निगवेकर (९८.१२), राजलक्ष्मी पाटील (९८.०४), प्रियांका पवार (९७.६१), प्रणव मांडरे (९७.४२), सायली पाटील (९७.४०), पूजा विश्वकर्मा (९७.४०), तय्यब शेख (९७.३५), शाल्व मोबाटे (९७.२८), सोनम कदम (९७.२३), ओम कासार (९७.२२), संकेत (९७.२१), कदम (९७.२१), प्रसाद अधिकर (९७.१६), रेहान मुल्ला (९७.०६), वैष्णवी शेटे (९७.०४), किल्लेदार (९७.०२) अशी आहेत.

या परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे चाटे समुहाचे संचालक प्रा. मच्छिंद्र चाटे, प्रा. गोपीचंद चाटे यांच्यासह कोल्हापूर विभागातील चाटे ज्यु. कॉलेजचे प्राचार्य, शैक्षणिक विभाग प्रमुख, चाटे कोचिंग क्लासेसचे शाखा व्यवस्थापक समुहाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंद केले.