Published June 3, 2023

बालासोर : ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला, तर 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले. बालासोर येथील बहानागा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

कोलकाता-चेन्नईकडे जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस आणि यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस बहानागाजवळ रुळावरून घसरली. यानंतर कोरोमंडल ट्रेल मालगाडीला धडकली. या अपघाताबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तातडीची बैठक बोलावली आहे.

एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सर्वप्रथम यशवंतपूर-हावडा एक्सप्रेस रुळावरून घसरली. त्याचे काही डबे दुसऱ्या रुळावरून उलटले आणि दुसऱ्या बाजूने येणाऱ्या शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्सप्रेसला धडकले. यानंतर कोरोमंडल ट्रेनच्या काही बोगीही रुळावरून घसरल्या. या बोगी दुसऱ्या ट्रॅकवर असलेल्या मालगाडीला धडकल्या. काही बोगी मालगाडीच्या वर चढल्या.

या अपघातात 15 डब्बे रुळांवरून घसरले आहेत. अजूनही अपघातग्रस्त रेल्वे डब्ब्यांमध्ये अनेक लोक अडकल्याचं बोललं जात आहे.

यापूर्वी, 14 जानेवारी 2022 रोजी पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथील डोमोहनीजवळ अपघात झाला होता. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला होता. राजस्थानमधील बिकानेरहून आसाममधील गुवाहाटीकडे जाणाऱ्या बिकानेर-गुवाहाटी एक्स्प्रेसचे 12 डब्बे रुळावरून घसरले होते. त्यानंतर तब्बल काल (शुक्रवार, 3 जून) 34 महिन्यांनी रेल्वे अपघात झाला होता. आता 16 महिन्यांनंतर म्हणजेच, जून 2023 मध्ये आणखी एक रेल्वे अपघात झाला आहे.

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी रेल्वे अपघात झाला. येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात 238 जणांचा मृत्यू झाला. 900 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की, कोरोमंडल एक्स्प्रेसच्या 15 बोगी रुळावरून घसरल्या. एक्सप्रेसचे अनेक डबे मालगाडीवर चढले. ही ट्रेन पश्चिम बंगालमधील शालीमारहून चेन्नई सेंट्रलला जात होती. 250 किमी गेल्यानंतर ट्रेनला अपघात झाला.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023