पाटणा (वृत्तसंस्था) : बिहारच्या पूर्व चंपारणमध्ये आज (रविवार) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे.  गोढियातील सिकारहाना नदीत बोट उलटल्याने बोटीतील २२ लोक नदीत बुडाले आहेत. याची बातमी पसरताच आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले.

पोलीस प्रशासन येईपर्यंत गावकऱ्यांनी नदीत बुडालेल्या लोकांचा शोध सुरू केला. आतापर्यंत नदीमधून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून पाच जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. होडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माणसे बसवल्यामुळे ही घटना घडली आहे. पोलीस प्रशासन इतर लोकांचा शोध घेत आहेत.