कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २२ कोरोनामुक्त…

0
115

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोविस तासात ८ जणांना कोरोनाची लागण झाली असून आज (गुरुवार) दोघांचा मृत्यू झाला आहे. तर ८८८ जणांचे कोरोनाचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यामध्ये कोल्हापूर शहर ४,चंदगड तालुक्यातील १, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १ आणि इतर जिल्ह्यातील १ अशा एकुण आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.

एकूण कोरोना रुग्ण संख्या – ४९,५२७.

डिस्चार्ज – ४७,७७२.

उपचारासाठी दाखल रुग्ण – ५०.

मृत्यू – १७०५.