‘त्या’ शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान कधी मिळणार ? : समरजितसिंह घाटगे   

मुरगूड (प्रतिनिधी) : राज्य शासनाने शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यत बिनव्याजी पीक कर्ज देण्याची घोषणा केली आहे. मात्र, यापूर्वी प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी केव्हा करणार, असा सवाल भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे  यांनी पत्रकाद्वारे केला आहे. घाटगे यांनी पत्रकात म्हटले आहे की, बिनव्याजी कर्जाची योजना खरं म्हणजे यापूर्वीचीच आहे.… Continue reading ‘त्या’ शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहनात्मक अनुदान कधी मिळणार ? : समरजितसिंह घाटगे   

मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : मराठा समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, अशी ग्वाही ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच कागलमध्ये ना. मुश्रीफ यांची सकल मराठा समाजाच्या  कार्यकर्त्यांनी भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, मराठा समाजाला घटनात्मकरित्या टिकणारे आरक्षण द्यावे, त्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे  मागणी करावी, सारथीवर कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करून या… Continue reading मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी पाठपुरावा करू : ना. हसन मुश्रीफ

संघवी हॉस्पिटलमध्ये मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून गेली ३५ वर्ष प्रख्यात बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश संघवी हे वैद्यकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी या वैद्यकीय सेवेला सामाजिक उपक्रमाची सुद्धा जोड आहे. यातूनच त्यांनी आज (शुक्रवार) कोरोना रुग्णांसाठी मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करून दिले आहेत. डॉ. संघवी यांच्या या सामाजिक आणि वैद्यकीय सेवेचा आदर्श सर्वाना… Continue reading संघवी हॉस्पिटलमध्ये मोफत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध…

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच :  ३७ जणांचा मृत्यू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्याची चिन्हे दिसत नाहीत. मागील चोवीस एकूण १४९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज १९५० जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील चोवीस तासांत कोल्हापूर महापालिका क्षेत्र- ४११, आजरा-७१, भुदरगड-५२, चंदगड-२७, गडहिंग्लज-५३, गगनबावडा-४, हातकणंगले-१४५, कागल-६९,  करवीर-२४०, पन्हाळा-१०८, राधानगरी-३६, शाहूवाडी-२१, शिरोळ-९२, नगरपरिषद क्षेत्र-१२०, इतर… Continue reading जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ सुरूच :  ३७ जणांचा मृत्यू

विमानतळ विस्तारीकरण जमिन मोजणीला प्रारंभ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या अतिरिक्त चौसष्ठ एकर जमिनीची मोजणी गडमुडशिंगी (ता. करवीर) येथे भुमी अभिलेख कार्यालय आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत सुरू झाली. आज (गुरुवार) सकाळी  साडेअकराला सुरू झालेली मोजणी सायंकाळी सहावाजेपर्यंत सुरु राहिली. तर शनिवार (दि. १२) अखेर ही मोजणी सुरू राहणार आहे. मोजणीच्या ठिकाणी खातेदारांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. या… Continue reading विमानतळ विस्तारीकरण जमिन मोजणीला प्रारंभ…

मडूर येथे आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम…

गारगोटी (प्रतिनिधी) : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवस नेहमीच विधायक उपक्रमाद्वारे साजरा करण्यात येतो. आज (गुरुवार) त्यांचा वाढदिवस भुदरगड तालुक्यात देखील विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी भुदरगड तालुक्यातील मडूर येथे भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील, गारगोटी ग्रा.पं. सदस्य अलकेश कांदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रशाळा मङूर आणि विद्यामंदिर कासारवाडी या दोन शाळा पूर्णतः सॅनेटाईज… Continue reading मडूर येथे आ. चंद्रकांतदादा पाटील यांचा वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम…

गारगोटीत रस्त्यावरच अनेक नागरिकांची अचानक कोरोना चाचणी…

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुका प्रशासनाने आज सकाळी दीडशेहून अधिक नागरिकांची अचानक कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये एक व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आला. या अचानक चाचणीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. आज (गुरुवार) गारगोटी येथे क्रांतीज्योतीसमोर अचानक कोविड चाचणी केंद्राची रुग्णवाहिका उभी राहिली.  त्यातून पीपीई किट घातलेले वैद्यकीय कर्मचारी उतरले. प्रशासनाच्या सहाय्याने त्यांनी रस्त्यावर विनाकारण फिरणारे लोक,… Continue reading गारगोटीत रस्त्यावरच अनेक नागरिकांची अचानक कोरोना चाचणी…

सर्व दुकाने चालू करण्यासाठी गांधीनगर बाजारपेठेत निदर्शने…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सरसकट सर्व दुकाने चालू करण्यास परवानगी द्या, या मागणीसाठी आज (गुरुवार) गांधीनगर होलसेल व्यापारी असोसिएशनच्या वतीने गांधीनगर येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. लॉकडाउन हटवा, व्यापाऱ्यांना वाचवा, असे विविध फलक घेऊन व्यापारी दुकानाच्या दारात घोषणा देत उभे होते. यावेळी शासकीय नियमांचे तंतोतंत पालन करण्यात आले. सकाळी ११ ते १२ या एक तासाच्या कालावधीत… Continue reading सर्व दुकाने चालू करण्यासाठी गांधीनगर बाजारपेठेत निदर्शने…

दिगवडेतील ग्रामस्थांकडून पंचगंगा स्मशानभूमीसाठी पाच टन लाकूड, शेणी दान…

कोतोली (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील दिगवडे येथील ग्रामस्थांनी  कोल्हापूरातील पंचगंगा स्मशानभूमीला ५ टन लाकूड आणि ५ हजार शेणी दान केल्या. यावेळी लाकूड आणि शेणी भरलेले ट्रॅक्टर नुकतेच कोल्हापूर पंचगंगा स्मशानभूमी येथे पाठवण्यात आले आहेत. यावेळी सरदार खाडे, संदीप पवार, शिवाजी काळे, प्रदीप पाटील, रमेश जाधव, अभिजित पवार आदी उपस्थित होते.

शिवडाव, कोंडोशी परिसरात ‘टस्कर’मुळे उस, फणसाचे मोठे नुकसान : शेतकरी त्रस्त

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या शिवडाव, अंतुर्ली, कोंडोशी परिसरात टस्कर हत्तीने सलग दहा दिवसांपासून मुक्काम ठोकला असून कोंडोशी व शिवडाव येथील ऊस पिकाचे रात्री नुकसान करून दिवसा हा हत्ती जंगलात निघून जात आहे. कडगांव वनक्षेत्रपाल बी. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाने शेतकऱ्यांची नुकसानभरपाई व हत्तीचे संरक्षण अशी दुहेरी यंत्रणा उभी केली आहे. गावोगावी गस्त घालण्याचे… Continue reading शिवडाव, कोंडोशी परिसरात ‘टस्कर’मुळे उस, फणसाचे मोठे नुकसान : शेतकरी त्रस्त

error: Content is protected !!