सम्राटनगरमधील ‘ते’ बांधकाम अखेर जमीनदोस्त : ‘आप’ च्या आंदोलनाला यश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सम्राटनगर येथील नाल्यात झालेल्या अनधिकृत बांधकाम हटवावे, यासाठी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर महापालिकेचे उप नगररचनाकार रमेश मस्कर यांनी हे अतिक्रमण काढून घेण्याची नोटीस बजावली होती. दोन आठवडे उलटूनही अतिक्रमण न काढल्याने अखेर ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी नगररचनाकार महाजन यांना सोमवारी भेटून धारेवर धरले. अखेर महाजन यांच्या आदेशानुसार आज (मंगळवार) महापालिकेच्या… Continue reading सम्राटनगरमधील ‘ते’ बांधकाम अखेर जमीनदोस्त : ‘आप’ च्या आंदोलनाला यश

गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : सरकारकडून नियमावली जाहीर

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरत असली तरी तिसरी लाट येण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्यभरात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज (मंगळवार) राज्य सरकारने नियमावली प्रसिद्ध करून  ‘यंदाही गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा’ असं आवाहन केले आहे. मागील वर्षाप्रमाणे सार्वजनिक गणेशमूर्ती ४ फूट आणि घरगुती… Continue reading गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा : सरकारकडून नियमावली जाहीर

गाळाभाडे, टॅक्स माफ करा : मुरगूडमधील व्यापाऱ्यांची नगरपालिकेकडे मागणी

मुरगूड (प्रतिनिधी) : मागील वर्षापासून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यामुळे व्यवसाय ठप्प झाले आहेत. तरीही आम्ही मागील वर्षाचे भाडे नगरपरिषदेला अदा केले आहे. यंदा मार्चपासून आमचे व्यवसाय बंद आहेत. आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून यंदाचे आमचे गाळाभाडे आणि टॅक्स माफ करावा अशी मागणी मुरगूड नगरपरिषदेच्या गाळ्यात व्यवसाय करणाऱ्या… Continue reading गाळाभाडे, टॅक्स माफ करा : मुरगूडमधील व्यापाऱ्यांची नगरपालिकेकडे मागणी

उंड्री येथे १०० नागरिकांची अँटिजेन टेस्ट : १२ पॉझिटिव्ह

उंड्री (प्रतिनिधी) : कोल्हापूरमधे कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता,कोल्हापूर प्रशासनाने आरोग्य विभागामार्फत गावोगावी कोरोना अँटिजेन टेस्ट कॅम्पचं आयोजन केलेले आहे.याचाच एक भाग म्हणून पन्हाळा तालुक्यातील उंड्री उपकेंद्रांतर्गत उंड्री आणि निवडे गावांमध्ये आरोग्याधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांनी १०० नागरिकांचे अँटिजेन घेतले. त्यापैकी १२ पॉझिटीव्ह आले आहेत. यावेळी आरोग्यसेवक युवराज गाडगीळ, परिचारिका संगीता जाधव, सरपंच शहाजी… Continue reading उंड्री येथे १०० नागरिकांची अँटिजेन टेस्ट : १२ पॉझिटिव्ह

आजऱ्याच्या उपनगराध्यक्ष पदी अनिरुद्ध केसरकर बिनविरोध…

आजरा (प्रतिनीधी) : आजरा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी अनिरुद्ध केसरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी होत्या. उपनगराध्यक्ष विलास  नाईक यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. अनिरुद्ध केसरकर यांचे नाव मावळते उपनगराध्यक्ष विलास नाईक यांनी सुचविले. त्याला संजीवनी सावंत यांनी अनुमोदन दिले. यावेळी पिठासन अधिकारी अजिंक्य पाटील यांनी केसरकर यांची बिनविरोध… Continue reading आजऱ्याच्या उपनगराध्यक्ष पदी अनिरुद्ध केसरकर बिनविरोध…

गोकुळ हर्बल गार्डन आयुर्वेदिक औषधांचा वापर जास्तीत जास्त करावा : विश्वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : दूध उत्पादकांना आणि संघाच्या प्रशिक्षण केंद्राकडे येणाऱ्या प्रशिक्षणाथींना आयुर्वेदिक गुणकारी असलेल्या वनस्पतींची माहिती होण्यासाठी हर्बल गार्डनची निर्मिती केली आहे. याचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी) आणि जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच ताराबाई पार्क येथे जनावरांच्या रोग निदान प्रयोगशाळेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. विश्वास पाटील म्हणाले की,… Continue reading गोकुळ हर्बल गार्डन आयुर्वेदिक औषधांचा वापर जास्तीत जास्त करावा : विश्वास पाटील

टोप संभापुर येथे ‘इस्त्री’वाल्याचा प्रामाणिकपणा…

टोप (प्रतिनिधी) :  टोप संभापूर येथे सचिन परीट यांचे मुळे त्यांच्या श्री गणेश वाशिंग इस्त्रीचे दुकान आहे. या दुकानात हिंदुराव मुळीक यांचे कपडे इस्त्रीसाठी आली होती. या कपड्यामध्ये सचिन यांना १० हजार रुपये सापडले. ते पैसे सचिन आणि विनोद परीट यांनी मुळीक यांना प्रामाणिकपणे परत केले. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून गावातील नागरीकांनी त्यांचा… Continue reading टोप संभापुर येथे ‘इस्त्री’वाल्याचा प्रामाणिकपणा…

कोल्हापुरातील सर्व दुकाने सुरू ठेवण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाला पाठवणार…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका व महानगर विकास प्राधिकरण क्षेत्र याचे एक युनिट धरुन येथील सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी मिळण्यासाठी आज (सोमवार) व्यापारी संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले आहे. राज्य शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी हा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठविण्यात येईल, असा निर्णय आज जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली… Continue reading कोल्हापुरातील सर्व दुकाने सुरू ठेवण्याच्या मागणीचा प्रस्ताव शासनाला पाठवणार…

मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेच्या रेकॉर्डवर आणा : कृती समिती

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  मराठा आरक्षण मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील प्रक्रिया अनेक वर्षे चालणारी आहे. त्यामुळे लवकर आरक्षण मिळवण्यासाठी लोकसभा हाच योग्य मार्ग आहे. त्यासाठी शिवसेनेचे खासदार म्हणून लोकसभेत हा मुद्दा रेकॉर्डवर आणावा अशी मागणी ठोक मोर्चा समितीच्या नेत्यांना खा. संजय मंडलिक यांच्याकडे केली. खा. संजय मंडलीक यांनी, लोकसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा रेकॉर्डवर आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करु,… Continue reading मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेच्या रेकॉर्डवर आणा : कृती समिती

‘हा’ तर छ. शाहू महाराज, शाहूभक्त बहुजन समाजाचा अवमान…

मुरगूड (प्रतिनिधी) : राधानगरी धरणस्थळी जाणीवपूर्वक घातलेली बंदी झुगारुन शाहूभक्त जनतेने मोठ्या उत्साहात शाहू जयंती साजरी केली. शाहू फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन व पुरोगामित्वाचा बुरखा पांघरुन त्यांच्याच नावाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंडळींना व त्यांच्या नेत्यांना हे चांगलेच खुपले आहे. म्हणूनच ते गोमूत्र शिंपण्याचा कार्यक्रम करणार असल्याचे म्हणत आहेत. या निमित्ताने पुरोगामी विचारांच्या नेत्याला, त्यांच्या पक्षाला… Continue reading ‘हा’ तर छ. शाहू महाराज, शाहूभक्त बहुजन समाजाचा अवमान…

error: Content is protected !!