कोल्हापूर आरटीओमध्ये १.२३ कोटींचा गैरव्यवहार : डॉ. स्टीव्हन अल्वारीस

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) मागील ५ वर्षांपासून ६१३ वाहनांचे मूल्य अल्प दाखवून संगनमताने १ कोटी २३ लाख ३७ हजार रुपयांचा कर शासनाच्या तिजोरीत जमा न करता परस्पर हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून त्याचा अहवाल आठवड्याभरात राज्याच्या परिवहन आयुक्तांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी… Continue reading कोल्हापूर आरटीओमध्ये १.२३ कोटींचा गैरव्यवहार : डॉ. स्टीव्हन अल्वारीस

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्यात कोल्हापूर अग्रस्थानी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामध्ये महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्हा अग्रस्थानी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत १३ लाख ३० हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून जिल्ह्यामध्ये लस वाया जाण्याचे प्रमाणही अत्यंत कमी आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले. लसीकरणाबाबत ना. पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यात ३० जूनपर्यंत एकूण… Continue reading कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात राज्यात कोल्हापूर अग्रस्थानी : ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर

महापालिकेकडून घरफाळा ६ टक्के सवलत योजनेस मुदतवाढ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापार, व्यवसाय, उद्योगधंदे बंद असल्यामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्तोत्र मर्यादित राहिले आहेत. त्यामुळे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी नागरिकांना दिलासा देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर (घरफाळा) भरण्यासाठी ३१ जुलै २०२१ पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. महानगरपालिकेने मंजूर धोरणानुसार दिनांक ३० जूनअखेर मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये… Continue reading महापालिकेकडून घरफाळा ६ टक्के सवलत योजनेस मुदतवाढ

जिल्ह्यात २०६३ जणांना कोरोनाची लागण : सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर शहरातील

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील चोवीस तासांत २०६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १,०३० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एकूण १९ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर महापालिका क्षेत्रात ५७५ तर करवीर तालुक्यात ३८० रुग्ण आढळून आले आहेत. गगनबावडा तालुक्यात… Continue reading जिल्ह्यात २०६३ जणांना कोरोनाची लागण : सर्वाधिक रुग्ण कोल्हापूर शहरातील

शेतकरी, व्यापाऱ्यांना घरफाळा, वीजबिलात सूट द्या : अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक वेळा लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे इतर जिल्ह्यांप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि सर्वसामान्य जनता असे घटक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना वीजबिल आणि घरफाळा यामध्ये सूट द्यावी, अशी मागणी माजी आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली. महाडिक यांनी निवेदनात म्हटले आहे की,… Continue reading शेतकरी, व्यापाऱ्यांना घरफाळा, वीजबिलात सूट द्या : अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इचलकरंजीत डेंग्यूची साथ रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा… : शिवसेनेचा इशारा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : आधीच कोरोना महामारीने ग्रस्त असलेल्या इचलकरंजीवासियांना आता डेंग्यूचा सामना करणे भाग पडले आहे. शहरात डेंग्यूचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून १६४ जणांना त्याची लागण झाली आहे. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. पालिका प्रशासन ही बाब गांभीर्याने घेत नाही. डेंग्यूचा फैलाव रोख्ण्यासाठी पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा आम्हाला… Continue reading इचलकरंजीत डेंग्यूची साथ रोखण्यासाठी उपाययोजना करा, अन्यथा… : शिवसेनेचा इशारा

दुष्काळात तेरावा महिना ! किणी, तासवडे नाक्यावरील टोल दरामध्ये वाढ

टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मागील वर्षांपासून सर्व क्षेत्र अडचणीत आहेत. तर दुसरीकडे देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. इंधन दरातील जबर वाढीने आधीच वाहनधारक वैतागले असताना त्यांच्यासाठी आणखी एक वाईट बातमी आहे. कोल्हापूर आणि सातारा दरम्यान असणाऱ्या किणी, तासवडे या दोन्ही टोल नाक्यांवर दरवाढ करण्यात आली आहे. उद्या (बुधवार) एक जुलैपासून दरवाढीची अंमलबजावणी होणार… Continue reading दुष्काळात तेरावा महिना ! किणी, तासवडे नाक्यावरील टोल दरामध्ये वाढ

केडीसीसी बँकेने आजरा साखर कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे दिला…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आजरा सहकारी साखर कारखान्याचा ताबा कारखान्याच्या संचालक मंडळाकडे सुपूर्द केला आहे. कारखान्यांने थकित कर्जापोटीची ७० कोटी रुपये रक्कम भरली. यामुळे कारखान्याला नवीन कर्ज मिळण्यासह हा हंगाम सुरू होण्याच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. केडीसीसी बँकेने साखर कारखान्याकडून कर्ज परतफेड थकल्यामुळे आजरा साखर कारखान्याचा ताबा घेतला होता. सेक्युरिटायजेशन ॲक्ट… Continue reading केडीसीसी बँकेने आजरा साखर कारखान्याचा ताबा संचालक मंडळाकडे दिला…

‘शाहू साखर’च्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात…

कागल  (प्रतिनिधी) : छ. शाहु साखर कामगार युनियन मार्फत एखादा कामगार जर मयत झाला तर त्यांना तातडीची आर्थिक मदत म्हणून एकूण कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या एक टक्के रक्कम देण्याची योजना कारखान्याचे संस्थापक राजे स्व. विक्रमसिंह घाटगे यांनी सुरू केली आहे. मागील काही दिवसात कारखान्याचे आठ कर्मचारी मयत झाले असून  कामगार संघटनेमार्फत त्यांच्या वारसांना प्रत्येकी १ लाख ८८… Continue reading ‘शाहू साखर’च्या मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदतीचा हात…

‘शैक्षणिक परिवर्तनाच्या पाउलवाटा’ हे पुस्तक गुणवत्ता विकासासाठी मार्गदर्शक : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : कागलचे गटशिक्षणाधिकारी डॉ. गणपती कमळकर यांनी शैक्षणिक प्रयोगांबाबत स्वानुभवावर लिहिलेले ‘शैक्षणिक परिवर्तनाच्या पाउलवाटा’ हे पुस्तक शालेय गुणवत्ता विकासासाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कागल येथे  पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित… Continue reading ‘शैक्षणिक परिवर्तनाच्या पाउलवाटा’ हे पुस्तक गुणवत्ता विकासासाठी मार्गदर्शक : ना. हसन मुश्रीफ

error: Content is protected !!