कलाविश्वाला धक्का : गुणी अभिनेत्याचा कोरोनाने मृत्यू…

मुंबई (प्रतिनिधी) : मनोरंजनविश्वाला धक्का देणारे एक दु:खद वृत्त आहे. चित्रपट, वेब सिरीज, मालिकांमध्ये आपल्या सहजसुंदर अभिनयाच्या ठसा उमटवलेले अभिनेते विक्रमजीत कंवरपाल (वय ५४) यांचे कोरोनाने निधन झाले आहे. दोन आठवड्यांपासून मुंबईतील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. कंवरपाल यांनी भारतीय सैन्यात मेजर म्हणून सेवा बजावली. २००३ साली सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर अभिनय क्षेत्राकडे ते… Continue reading कलाविश्वाला धक्का : गुणी अभिनेत्याचा कोरोनाने मृत्यू…

प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आजतक वाहिनीचे प्रसिद्ध अँकर रोहित सरदाना यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर आता दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचेही कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या निधनामुळे मीडिया क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. आपण रुग्णालयात उपचार घेत आहोत,  सोबतच मला तुमच्या सर्वांच्या प्रार्थनांची गरज असल्याची पोस्ट त्यांनी दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर… Continue reading प्रसिद्ध अँकर कनुप्रिया यांचे कोरोनामुळे निधन

यड्राव येथील महालक्ष्मी प्रकल्पच ‘ऑक्सिजन’वर..! (व्हिडिओ)  

शिरोळ (प्रतिनिधी) : यड्राव येथील महालक्ष्मी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प ३६ तासापासून लिक्विड नसल्याने बंद झाल्याने ऑक्सिजन निर्मिती ठप्प झाली आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा असताना हा प्रकल्प बंद झाल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. दोन दिवसापूर्वीच खा. धैर्यशील माने, जिल्हाधिकारी दौलत देसाई, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, माजी आ. उल्हास पाटील यांनी या  प्रकल्पला भेट दिली होती. त्यावेळी… Continue reading यड्राव येथील महालक्ष्मी प्रकल्पच ‘ऑक्सिजन’वर..! (व्हिडिओ)  

इचलकरंजीमध्ये पोलिस प्रशासनाचा कारवाईचा बडगा… 

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शासनाने आज (शनिवार) पासून पुन्हा पंधरा दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. यामध्ये अकरा वाजल्यानंतर अत्यावश्यक सेवासोडून जे व्यापारी आपले उद्योग चालू ठेवत आहेत तसेच विनाकारण गाडीवरुन रस्त्यावर फिरणाऱ्यांवर इचलकरंजीमध्ये कारावाईचा बडगा उचलला आहे. यावेळी पोलीस अधीक्षक एस. पी. गायकवाड, ग्रामीण पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या आदेशानुसार गावभागचे सपोनि. गजेंद्र लोहार, शिवाजीनगर… Continue reading इचलकरंजीमध्ये पोलिस प्रशासनाचा कारवाईचा बडगा… 

गिरगावमधील कोरोनाबाधिताचा ऑक्सिजनअभावी मृत्यू  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात ऑक्सिजन न मिळाल्याने आज (शनिवार) सकाळी ९ च्या दरम्यान एका कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाला. माजी सैनिक सर्जेराव पांडुरंग कुरणे (वय ४१, रा. गिरगाव, ता. करवीर) असे मृताचे नांव आहे. त्यांच्यावर कोल्हापुरातील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. एकीकडे प्रशासनाकडून ऑक्सिजन कमी पडू देणार नसल्याच्या वल्गना होत असताना दुसरीकडे मात्र, ऑक्सिजन अभावी या… Continue reading गिरगावमधील कोरोनाबाधिताचा ऑक्सिजनअभावी मृत्यू  

महाराष्ट्र दिन : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

कोल्हापूर  (प्रतिनिधी) :  महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. या ध्वजारोहण समारंभाला जिल्हाधिकारी दौलत देसाई,  महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे,  पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे,  जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने,  अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार,  निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे,… Continue reading महाराष्ट्र दिन : पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण

जिल्हा पोलीस प्रमुखांकडून हातकणंगले पोलिसांचे कौतुक

हातकणंगले (प्रतिनिधी)  : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या  माध्यमातून संचारबंदी दरम्यान जिल्ह्यात राबविलेल्या कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी  हातकणंगले पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. तसेच प्रभावीपणे कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करा. कामात  कसूर करणाऱ्यांची गय करू नका, अशा सूचना पोलीस दलाला दिल्या. दरम्यान, पोलीस उपाधीक्षक साहिल झरकर यांच्या… Continue reading जिल्हा पोलीस प्रमुखांकडून हातकणंगले पोलिसांचे कौतुक

error: Content is protected !!