राजसी वृद्धाश्रमाच्या वतीने २५ कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

पन्हाळा (प्रतिनिधी) : ऐतिहासिक पन्हाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या बुधवार पेठ गावातील राजसी वृद्धाश्रमाच्या वतीने २५ गरजू कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सप्रे कुटुंबीय, यश मेटॅलिक्स शिरोली एमआयडीसीच्या वतीने या गरजू कुटुंबीयांना हे किट पन्हाळा पोलीस ठाण्याच्या एपीआय पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी राजसी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत यादव, उपाध्यक्ष शब्बीर मुजावर, संचालक कोंडेकर, राजेश… Continue reading राजसी वृद्धाश्रमाच्या वतीने २५ कुटुंबीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप…

‘या’ साठी शरद पवार पुढाकार घेणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी – आ. चंद्रकांतदादा पाटील

गारगोटी (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मताचे आम्ही आहोत, मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास शरद पवार पुढाकार घेणार असतील आणि प्रामाणिक प्रयत्न करणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असे मत आज आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर ता भुदरगड येथे आज आ. पाटील आले होते,त्यावेळी ते बोलत होते. भुदरगड तालुका सकल… Continue reading ‘या’ साठी शरद पवार पुढाकार घेणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी – आ. चंद्रकांतदादा पाटील

सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल करावा : ग्रामस्थांची मागणी

टोप (प्रतिनिधी) : शिरोली सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल करावा तरच महापुराच्या पाण्यापासून शिरोली, शिये, कसबा बावडा, भुते, निगवे, चिखली ही गावे वाचणार आहेत. महामार्गाची उंची वाढली तर ही गावे पाण्याखाली जातील त्यामुळे पिलरचा उड्डाणपूल उभा करावा अशी मागणी शिरोली व शिये ग्रामस्थांनी केली. बास्केट ब्रिज, गांधीनगर फाटा येथील ब्रिज, पंचगंगा नदीवरील पुल… Continue reading सांगली फाटा ते पंचगंगा नदीपर्यंत पिलरचा उड्डाणपूल करावा : ग्रामस्थांची मागणी

वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील – ना. हसन मुश्रीफ         

कागल (प्रतिनिधी) : राज्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप करून त्यांचा राजीनामा घ्यायला भाग पाडले. कालच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निलंबित असलेल्या  परिवहन खात्याच्या गजेंद्र पाटील या उपनिरीक्षकांने गुन्हा दाखल करून सीबीआयकडे चौकशीची मागणी केली आहे. हा गजेंद्र पाटील म्हणजे परमवीरसिंगचा दुसरा भाऊच दिसतो. वर्दीतील हे दरोडेखोर उच्च… Continue reading वर्दीतील दरोडेखोर लवकरच गजाआड जातील – ना. हसन मुश्रीफ         

चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आलीया..! – हसन मुश्रीफ            

कागल (प्रतिनिधी) : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना फार मस्ती आली आहे, असा पुनरुच्चार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. सत्ता गेल्यामुळे भ्रमनिरास झालेले पाटील ऊठसूट राज्यातील नेत्यांना तंब्या देऊन स्वतःचं हसं करून घेत आहेत,  अशी कोपरखळीही त्यांनी मारली. कागलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चंद्रकांत पाटील यांनी तंबी दिल्याबाबत… Continue reading चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आलीया..! – हसन मुश्रीफ            

आजऱ्यातील बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेच्या सभासदांना कर्ज वितरण

आजरा (प्रतिनिधी) : आजरा येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे विकास सेवा  संस्था व कोल्हापूर जिल्ह्य मध्यवर्ती सहकारी बँक यांचे वतीने संस्थेच्या सभासद उषा कृष्णाजी देसाई यांना जमीन खरेदीसाठी १२ वर्षे मुदतीने १२लाख मध्यम मुदत कर्जाचे वितरण जिल्हा बँकेचे संचालक अशोक चराटी यांच्या हस्ते करण्यात आले.या कर्जाबरोबरच ३ सभासदांना किसान सहाय्य मध्यम मुदत ४ लाख ८० हजार… Continue reading आजऱ्यातील बाळासाहेब ठाकरे विकास सेवा संस्थेच्या सभासदांना कर्ज वितरण

उद्योगपती नवनाथ सातवेकर युवा मंचच्यावतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप

मुरगुड (प्रतिनिधी) : मुरगुड मध्ये कोरोनाचे वाढते प्रमाण लक्ष्यात घेता प्रशासन यंत्रणेने कडक निर्बंध घातल्याने गोरगरीब ,कष्टकरी लोकांना त्याचा जबर फटका बसला आहे पण हे भयरुपी संकट थोपवण्यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. पण समाजातील गोरगरिबांची व्यथा ओळखुन मुरगुडमधील युवा उद्योजक नवनाथ सातवेकर युवा मंच च्या वतीने १०० गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप दै. लोकमत… Continue reading उद्योगपती नवनाथ सातवेकर युवा मंचच्यावतीने जीवनावश्यक वस्तूचे वाटप

निगवे दुमालाच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार – खा. मंडलिक

निगवे दुमाला (प्रतिनिधी) : निगवे दुमालाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेऊ असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले. येथील विकास कामाच्या उद्घाटन प्रसंगी हे बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा एकशिंगे होत्या. माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील हे प्रमुख उपस्थित होते. खासदार मंडलिक साहेब यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन मधून पुरहानी व अतिवृष्टी या योजनेतून रामा… Continue reading निगवे दुमालाच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार – खा. मंडलिक

सहापदरी महामार्गामुळे रस्ते सुरक्षा वाढेल – ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : कागल – सातारा राष्ट्रीय महामार्ग सहापदरी झाल्यानंतर रस्ते सुरक्षा वाढेल असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. मंत्री मुश्रीफ यांच्यासह पालकमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील या लोकप्रतिनिधींसह अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामाचा सर्वे केला. कोगनोळी टोल नाक्याजवळच्या कागल हद्दीपासून घुणकी पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचा… Continue reading सहापदरी महामार्गामुळे रस्ते सुरक्षा वाढेल – ना. हसन मुश्रीफ

केंद्रातील सरकार गेली सात वर्षे फक्त इव्हेंट व इमेज मॅनेजमेंटमध्ये व्यस्त : काँग्रेसतर्फे निषेध

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रातील सरकारला सात वर्षे पूर्ण झाली. गेली सात वर्षे फक्त इव्हेंट व इमेज मॅनेजमेंट यामध्ये सरकार अडकून पडल्याने सर्वसामान्य माणूस संकटाच्या गर्तेत सापडला आहे. मोदी सरकारच्या सात वर्षातील काळ्या कारभाराचा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात आला. मोदी सरकारच्या या कारभारा विरोधात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नियोजनानुसार कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने… Continue reading केंद्रातील सरकार गेली सात वर्षे फक्त इव्हेंट व इमेज मॅनेजमेंटमध्ये व्यस्त : काँग्रेसतर्फे निषेध

error: Content is protected !!