हातकणंगले येथे अवैध दारूची विक्री करणाऱ्याला अटक

हातकणंगले (प्रतिनिधी) :  हातकणंगले पोलीस ठाण्यापासून अवघ्या १ किलोमीटर अंतरावर काळ्या बाजाराने देशी बनावटीची दारू विकणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. राजकुमार अशोक घाटकर (रा. हातकणंगले)  अशी अटक केलेल्याचे नांव आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून अंदाजे १५  हजार ६०० रुपये किंमतीच्या दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत . ही कारवाई हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस… Continue reading हातकणंगले येथे अवैध दारूची विक्री करणाऱ्याला अटक

आणखी एका ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू

आजरा (प्रतिनिधी) : गोकुळच्या निवडणुकीला अवघे दोन दिवस बाकी असताना आणखी एका ठरावधारकाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  गडहिंग्लज तालुक्यातील शेंद्री येथील महालक्ष्मी दूध संस्थेचे ठरावधारक सज्जन विठोबा तोडकर (वय ७२) यांचे कोरोनामुळे निधन झाले. तोडकर यांच्यावर  गडहिंग्लज येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू होते.  गुरूवारी   त्यांची प्राणज्योत मावळली.  शेंद्री गावात त्यांनी सामाजिक व सहकार… Continue reading आणखी एका ‘गोकुळ’च्या ठरावधारकाचा कोरोनामुळे मृत्यू

पेठवडगाव येथे भाजप युवामोर्चातर्फे रक्तदान शिबिर  

हातकणंगले (प्रतिनिधी) :  हातकणंगले तालुका भाजप युवामोर्चाच्या वतीने पेठवडगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी रक्तदात्यांना दलित मित्र डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शिबिराचे आयोजन युवामोर्चा तालुका अध्यक्ष सुहास जाधव,  बंडा गोंधकर, पियूष शहा, वडगाव युवामोर्चाचे अध्यक्ष रणजित पाटील, शहर अध्यक्ष जगन्नाथ  माने, महिला संयोजिका उमा… Continue reading पेठवडगाव येथे भाजप युवामोर्चातर्फे रक्तदान शिबिर  

…तर लवकरच धनंजय महाडिक तुरूंगात दिसतील : राजेखान जमादार

कागल (प्रतिनिधी) :  महालक्ष्मी दूध संघ अडचणीमध्ये आला त्याचे कारण म्हणजे राजकारण केले गेले. या संघाकडून कोणाचेही देणे शिल्लक राहिलेले नाही. दरम्यान, महालक्ष्मी दूध संघावर खोटेनाटे आरोप करणारे माजी खासदार धनंजय महाडिक भीमा साखर कारखान्यातील गैरव्यवहारामुळे नजीकच्या काळात तुरुंगातच दिसतील, असा दावा मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केला आहे. कागलमध्ये गोकुळ दूध संघ निवडणुकीत राजर्षी… Continue reading …तर लवकरच धनंजय महाडिक तुरूंगात दिसतील : राजेखान जमादार

सादळे येथे लागलेल्या आगीत वनसंपदा नष्ट..

टोप (प्रतिनिधी) : कासारवाडी परिसरातील सादळे येथे आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास डोंगराला लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा, शेकडो वृक्ष जळून खाक झाले. परंतु, अग्निशमन दल न पोहचल्यामुळे स्थानिक नागरिकांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये सुमारे दहा ते पंधरा एकरातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. डोंगराळ परिसरातील काही ठिकाणी गवत कापले नसल्यामुळे ही आग पसरत… Continue reading सादळे येथे लागलेल्या आगीत वनसंपदा नष्ट..

घरोघरी कोव्हिड तपासणी अभियान फायद्याचे : अश्विनी वरुटे

गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या गावागावात कोरोना संसर्गाच्या तपासाची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे कोरोनाचे समूळ उच्चाटन करणे सोपे जाणार असल्याचे मत भुदरगडच्या तहसिलदार अश्विनी वरुटे यांनी व्यक्त केले. यावेळी अश्वीनी वरुटे यांच्या मार्गदर्शनाखाली आज भुदरगड तालुक्यातील ४१ गावात हे मोहीम राबवण्यात आली. तसेच गारगोटीमध्ये   कोव्हिडच्या तपासणी केल्या जात आहेत. यासाठी प्रत्येक गावातील नागरीकांना घरात… Continue reading घरोघरी कोव्हिड तपासणी अभियान फायद्याचे : अश्विनी वरुटे

राज्यात लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढला : नवा आदेश जारी

मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने सरकारने सध्या राज्यात सुरू असलेला लॉकडाउन १५ मे पर्यंत वाढवला आहे. सरकारने यासंदर्भात आदेश काढला असून त्यानुसार सध्या राज्यात लागू असलेले निर्बंध १५ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर यासंदर्भातले संकेत दिले होते. त्यानुसार आज (गुरुवार) सायंकाळी… Continue reading राज्यात लॉकडाऊन १५ मे पर्यंत वाढला : नवा आदेश जारी

शिंदेवाडीमध्ये भाऊबंदकीच्या वादातून मारामारी : परस्परांविरोधी फिर्याद दाखल

गारगोटी (प्रतिनिधी) : गारगोटी परिसरात असलेल्या शिंदेवाडी गावामध्ये भाऊबंदकीच्या वादातून काल (बुधवार) रात्री मारामारी झाली. यामध्ये  काठी, कुऱ्हाड, फावडे आणि खुरप्याचा सर्रास वापर झाला. दोन महिलांसह पाचजण जखमी झाले असून भुदरगड पोलिसांत परस्परांविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. दोन्ही बाजूच्या दहा जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सहाजणांना ताब्यात घेतले आहे. याबाबत फिर्याद भगवान नामदेव… Continue reading शिंदेवाडीमध्ये भाऊबंदकीच्या वादातून मारामारी : परस्परांविरोधी फिर्याद दाखल

परमबीर सिंग यांचा ठाकरे सरकारवर पुन्हा गंभीर आरोप

मुंबई (प्रतिनिधी) : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात लिहिलेले पत्र मागे घेण्यासाठी दबाव येत आहे. तसेच राज्य सरकार एकापाठोपाठ एक गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती मिळाल्याचा दावा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल केली आहे. परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला… Continue reading परमबीर सिंग यांचा ठाकरे सरकारवर पुन्हा गंभीर आरोप

कोल्हापुरातील कोरोना लसीकरण केंद्रे सकाळी सुरू करा : आ. चंद्रकांत जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील कोरोना लसीकरण केंद्रे सकाळी सातपासून सुरु करावीत, लस किती उपलब्ध आहे याची माहिती केंद्राच्या बोर्डावर एक दिवस अगोदर जाहीर कराव्यात, अशा सूचना आ. चंद्रकांत जाधव यांनी महापालिकेच्या आयुक्त डॉ. कादबंरी बलकवडे यांना दिल्या. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे कोल्हापूर शहरात लसीकरण सुरु आहे. मात्र मागणीच्या तुलनेत लस कमी प्रमाणात उपलब्ध… Continue reading कोल्हापुरातील कोरोना लसीकरण केंद्रे सकाळी सुरू करा : आ. चंद्रकांत जाधव

error: Content is protected !!