शरद पवारांची रात्री शस्त्रक्रिया ; सकाळी ठणठणीत

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पोटदुखीचा त्रास वाढल्याने मंगळवारी रात्री त्याच्यावर तातडीने ब्रीच कँडी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (बुधवार) सकाळी शरद पवारांचा रूग्णालयातील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात पवार वृत्तपत्र वाचताना दिसत आहेत. सुप्रभात, ब्रीच कँडी रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स,… Continue reading शरद पवारांची रात्री शस्त्रक्रिया ; सकाळी ठणठणीत

महादेवराव महाडिक, राजू शेट्टी यांच्यात खलबते

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ निवडणुकीसाठी दोन्ही आघाडीकडून जोडण्या लावण्यास वेग आला आहे. मंगळवारी ज्येष्ठ नेते महादेवराव महाडिक यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. त्यानंतर आज (बुधवारी) सकाळी त्यांनी  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन तासभर चर्चा केली. राज्यात महाविकास आघाडीकडून डावलल्याची भावना शेट्टी यांच्यामध्ये आहे. त्यातच… Continue reading महादेवराव महाडिक, राजू शेट्टी यांच्यात खलबते

संभाजीनगर बसडेपोच्या रेकॉर्डरुमला आग : कागदपत्रे भस्मसात

कोल्हापूर (प्रतिनीधी) : कोल्हापुरातील संभाजीनगर येथील एसटी डेपोच्या रेकॉर्डरुमला आज (मंगळवार) अचानक सायंकाळी ६ च्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याने येथील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. संभाजीनगर येथील बसस्थानकाच्या रेकॉर्डरूमला आज सायंकाळी अचानक शॉर्टसक्रिटने आग लागली. रेकॉर्डरूममध्ये कागदपत्रे असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले.… Continue reading संभाजीनगर बसडेपोच्या रेकॉर्डरुमला आग : कागदपत्रे भस्मसात

दीपाली चव्हाण आत्महत्या : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक निलंबित

अमरावती (प्रतिनिधी) : मेळघाटमधील वनरक्षक दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्याप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक एम. एस. रेड्डी यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात विनोद शिवकुमारला अटक करण्यात आली आहे. मात्र, रेड्डी यांचेवर कारवाई झाली नव्हती, त्यामुळे भाजपने कारवाईसाठी दबाव वाढवला होता. राज्य सरकारने अखेर रेड्डी यांना निलंबित केल्याचा आदेश काढला असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने… Continue reading दीपाली चव्हाण आत्महत्या : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक निलंबित

कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ८२ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८२ जणांना कोरोनाची लागण झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज (मंगळवार) दिवसभरात ७७ जण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. १,०९३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ४४, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील ४, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १०, शाहूवाडी… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : चोवीस तासात ८२ जणांना कोरोनाची लागण

पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापुरातून शिरोलीला जाणाऱ्या मोटरसायकलला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. रणजीत भुलर पाल (वय २५) असे या मृत तरुणाचे नाव आहे. हा अपघात काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास पंचगंगा नदी पुलावर घडला. उत्तप्रदेशमधील प्रतापगढ जिल्ह्यातील भारीया गावचा रणजित पाल हा कुटुंबांसह कोल्हापूरत जाधववाडी इथे भाड्याच्या घरात राहत होता. तो… Continue reading पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात : एकाचा मृत्यू

गोकुळ निवडणूक : महाडिकांच्या भेटीनंतरही आवाडेंची भूमिका गुलदस्त्यात…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचाली वेगावल्या आहेत. सत्तारूढ आघाडीचे नेते, माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आज (मंगळवार) इचलकरंजी येथे जाऊन आ. प्रकाश आवाडे यांची भेट घेतली. पण त्यांच्या भेटीतून अद्याप तरी काही निष्पन्न झाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आ. प्रकाश आवाडे यांनी ‘गोकुळ’बाबत आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवून उत्सुकता वाढवली आहे. प्रकाश आवाडे यांनी… Continue reading गोकुळ निवडणूक : महाडिकांच्या भेटीनंतरही आवाडेंची भूमिका गुलदस्त्यात…

ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करा : राजू शेट्टी

मुंबई (प्रतिनिधी) : गेल्या दीड वर्षापासून ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची मुदत संपली आहे. त्यामुळे ऊसदर नियंत्रण मंडळाची बैठक झाली नसून तातडीने सदस्यांची नियुक्ती करून बैठक घेण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी ऊसदर नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे केली. गतवर्षीच्या गळीत हंगामातील जवळपास ३०० कोटी रूपयाहून अधिक रूपयांची एफआरपी थकविली… Continue reading ऊसदर नियंत्रण मंडळाच्या सदस्यांची नियुक्ती करा : राजू शेट्टी

राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा : राजू शेट्टी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा असून तातडीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी अधिकाऱ्यांवर  कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री दादासो भुसे यांच्याकडे केली. तसेच लॉकडाऊन करायचे असेल तर शेतमालाच्या वितरण व्यवस्थेची व्यवस्था करावी,  शेतमालाचे दर पडणार नाहीत  याची खात्री द्यावी, अशी मागणी मुख्य सचिव… Continue reading राज्यात कृषी अवजार वाटपात मोठा घोटाळा : राजू शेट्टी

कोल्हापुरातील ‘डी मार्ट’ला महापालिकेचा दणका

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  महापालिकेच्या वतीने कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्याविरोधात कारवाईचा धडका सुरू केला आहे. त्यानुसार रंकाळा चौपाटीवरील खाऊचे स्टॉल आणि रंकाळ्याजवळील ‘डी मार्ट’ येथे तपासणी करण्यात आली. यावेळी येथे कोरोना नियमांचा भंग करण्यात आल्याचे निदर्शनास आले असता महापालिकेच्या भरारी पथकाने दंडात्मक कारवाई केली.           डी मार्टमध्ये सोशल डिस्टंन्सचे पालन होत… Continue reading कोल्हापुरातील ‘डी मार्ट’ला महापालिकेचा दणका

error: Content is protected !!