कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय गटांना वाहन वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सेंद्रिय गटांना जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते आज (बुधवार) वाहन वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते पीजीएस ऑरगॅनिक प्रमाणपत्राचे प्राथमिक स्वरुपात वाटप करण्यात आले. यावेळी महालक्ष्मी सेंद्रिय गटाला सेंद्रिय भाजीपाला बास्केट भेट म्हणून देण्यात आले. जिल्ह्यामध्ये सेंद्रिय शेती योजनेअंतर्गत एकूण ३७ गट स्थापन झाले आहेत. या गटांना… Continue reading कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय गटांना वाहन वाटप

‘शिवनाकवाडी’च्या सुधारित पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता : ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी या गावासाठी स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना मंजूर होती, परंतु काही तांत्रिक कारणांमुळे या योजनेचे काम अर्ध्यावरच रखडले होते. या सुधारित योजनेच्या अंदाजपत्रकास शासनाने मान्यता दिली असून सुमारे ३ कोटी २ लाखांच्या या योजनेची निविदा लवकरच प्रसिद्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, असे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी स्पष्ट… Continue reading ‘शिवनाकवाडी’च्या सुधारित पाणी योजनेस प्रशासकीय मान्यता : ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर

तिरपणचे वैभव पाटील यांची ‘डॉक्टरेट पदवी’साठी निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर मराठा कमांडो सेक्युरिटी, इंटेलिजन्स आणि मॅनपॉवर फोर्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कमांडो अधिकारी वैभव पाटील यांची डॉक्टरेट पदवीसाठी निवड झाली आहे. ‘मिलिटरी सायन्स’ या विषयातील डॉक्टरेट पदवीसाठी दिल्ली येथील वर्ल्ड ह्युमन राईट प्रोटेक्शन कमिशनकडून त्यांची निवड झाली आहे. ही पदवी त्यांना ६ जून २०२१ रोजी पितामपूर दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार… Continue reading तिरपणचे वैभव पाटील यांची ‘डॉक्टरेट पदवी’साठी निवड

ऑटोमेटिक पेमेंटच्या नियमात १ एप्रिलपासून ‘मोठा’ बदल

मुंबई (प्रतिनिधी) : मोबाईल रिचार्ज, वीजबिल किंवा इतर बिले आपोआप भरली जाणार नाहीत. कारण १ एप्रिलपासून डिजिटल पेमेंटच्या नियमात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बदल केला आहे. आयआरबीने ऑटो डेबिट पेमेंटच्या सेवेसाठी ‘अ‍ॅडिशनल फॅक्टर ऑफ ऑथेंटिकेशन’चा आणखी एक पर्याय उपलब्ध केला आहे. यामुळे   दरमहा परस्पर ग्राहकांच्या बँक खात्यामधून ठराविक पैसे कट होण्याची पद्धत बंद होणार आहे.… Continue reading ऑटोमेटिक पेमेंटच्या नियमात १ एप्रिलपासून ‘मोठा’ बदल

दुकाने ८ वाजता बंद करण्याचा आदेश मागे घ्या : भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत दुकाने व व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे.  कोल्हापूर शहरात रात्री ८ वाजता दुकाने बंद करण्यासाठी प्रशासनाकडून दबाव तंत्र वापरले जात आहे. तरी हा आदेश मागे घेण्यात यावा, अशी मागणी करून… Continue reading दुकाने ८ वाजता बंद करण्याचा आदेश मागे घ्या : भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून नवा वाद

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या जागेवरून वादविवाद झाले. आता यावरून नवा वाद होण्याची शक्यता आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुन्या महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. स्मारकाचे भूमिपूजन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिलेले नाही. यावरून… Continue reading आता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावरून नवा वाद

…त्यादृष्टीने लोकांनी मानसिक तयारी ठेवावी : राजेश टोपे

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात लॉकडाउन लावण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यासंबंधी चर्चा नेहमी सुरु असते. निर्बंध अधिक कडक करण्यासंबंधीचे पावले राज्य शासन उचलणारच आहे. त्यादृष्टीने लोकांनी मानसिकता ठेवली पाहिजे. गर्दी होणाऱ्या सर्व ठिकाणी कठोर निर्बंध आणण्यासाठी नियोजन करत आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (बुधवार) पत्रकार परिषदेत दिली. टोपे म्हणाले की, लसीकरण वेगाने… Continue reading …त्यादृष्टीने लोकांनी मानसिक तयारी ठेवावी : राजेश टोपे

रंकाळा विकासासाठी दरवर्षी १ कोटींचा निधी देऊ : पालकमंत्री

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रंकाळा तलाव विकासासाठी जिल्हा नियोजन मंडळातून दरवर्षी एक कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. नगरसेवक शारंगधर देशमुख यांच्या प्रयत्नातून रंकाळा तलाव परिसरात झालेल्या विविध विकासकामांचे व स्वयंचलित पद्धतीने बसविलेल्या विविध प्राण्यांच्या प्रतिकृतीचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले की, जलसंपदा विभागाकडे… Continue reading रंकाळा विकासासाठी दरवर्षी १ कोटींचा निधी देऊ : पालकमंत्री

चंद्रकांत पाटील त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की…: शिवसेनेचा टोला

मुंबई (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री  अमित शहा यांच्या गुप्त भेटीच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या भेटीवरून अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. या   भेटीवर शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. सध्या पवार थोडे आजारी आहेत. त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया होत आहे, पण वैफल्य व निराशा यामुळे पित्त खवळले आहे… Continue reading चंद्रकांत पाटील त्याच पतंगाच्या मांजावरून इतके वर गेले की…: शिवसेनेचा टोला

सराफ संघाच्या टर्फ क्रिकेट स्पर्धेत सोना-चांदी संघाची बाजी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने आयोजित टर्फ प्रिमियम क्रिकेट लीग स्पर्धेमध्ये सोना – चांदी संघाने विजेतेपद पटकाविले. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या वतीने सराफ, सुवर्णकार व्यावसायिकांसाठी टर्फ प्रीमियर क्रिकेट लीगचे आयोजन करण्यात आले होते. १२ संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेमध्ये सोना चांदी आणि राठोड रॉयल्स या दोन संघात अंतिम सामना झाला. यावेळी सोना-चांदी संघाने… Continue reading सराफ संघाच्या टर्फ क्रिकेट स्पर्धेत सोना-चांदी संघाची बाजी

error: Content is protected !!