सादळे-मादळे डोंगर परिसराला भीषण आग

टोप (प्रतिनिधी) : मनपाडळेनजीकचा सादळे-मादळे हा डोंगर भाग जंगली झाडे व झुडपांनी वेढला गेला आहे. आज (बुधवार) सायंकाळी सहाच्या सुमारास मनपाडळे परिसरातून वणवा पेटला. काही क्षणातच सादळे-मादळे डोंगर परिसरात वणवा पसरला. यामध्ये जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे गवत व दहा ते पंधरा हेक्टर डोंगर परिसरातील वनसंपदा जळून खाक झाली. या वणव्यात नैसर्गिक साधन संपत्ती,… Continue reading सादळे-मादळे डोंगर परिसराला भीषण आग

कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णसंख्येची वाटचाल आठशेकडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ८१ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आज (मंगळवार) दिवसभरात ८० जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर १५६३ जणांचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या ७७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोल्हापूर शहरातील २५, भुदरगड तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील ८,गगनबावडा तालुक्यातील १,हातकणंगले तालुक्यातील ९, कागल तालुक्यातील ३, करवीर… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : रुग्णसंख्येची वाटचाल आठशेकडे

हसन मुश्रीफ यांनी मुंबईत घेतली कोरोना प्रतिबंधक लस…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (बुधवार) मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, ही लस अत्यंत सुरक्षित आहे. राज्यातील नागरिकांना आवाहन करतो की, पात्र ठरलेल्यांनी लसीकरण जरूर करून घ्यावे. लसीकरण व कोविडमुक्तीसाठी प्रयत्नशील असलेल्या आरोग्य विभागातील प्रत्येक कर्मचाऱ्याचे आभार मानले पाहिजेत.

जोतिबा मंदिर परिसरात सर्वांना चप्पलबंदी करा, अन्यथा… : मनसेचा इशारा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : वाडी रत्नागिरी (ता. पन्हाळा) येथील श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात चप्पलबंदी करणेत यावी. तसेच मंदिरामध्ये ड्रेनेजचे काम सुरु असून निरूपयोगी साहित्य मंदिराबाहेर हलवावे, दुर्मीळ जुने दगड व्यवस्थित ठेवावेत, अशी मागणी मनसेने देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांचेकडे निवेदनाद्वारे केली. यावर योग्य कार्यवाही न झाल्यास २ एप्रिल रोजी मनसे स्टाईलने चप्पलबंदी आणि बोंब मारो… Continue reading जोतिबा मंदिर परिसरात सर्वांना चप्पलबंदी करा, अन्यथा… : मनसेचा इशारा

उष्माघातामुळे कोल्ह्याचा मृत्यू…

राशिवडे (प्रतिनिधी) : सध्या उन्हाचा तडाखा जास्त प्रमाणात आहे त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्य प्राणी जंगली भाग सोडून नागरी वस्तीत येताना दिसत आहेत. अत्यवस्थ अवस्थेत असणाऱ्या प्राण्यांना वेळेत उपचार नाही मिळाले तर ते दगावण्याची शक्यता जास्त असते यामुळे नागरिकांनी अशा वेळी त्वरित वन विभागाशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे असे आवाहन वन परिमंडळ अधिकारी आर. एस. तिवडे… Continue reading उष्माघातामुळे कोल्ह्याचा मृत्यू…

राज्य सरकारकडून आणखी एक झटका : घर, जमीन खरेदी-विक्री आणखी महागली…

मुंबई (प्रतिनिधी) : राज्य सरकारच्या एका निर्णयाने घर खरेदी-विक्री करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. घर जमीन खरेदी विक्री करण्यासाठी जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. मुद्रांक शुल्कात  (स्टँप ड्युटी) दिली जाणारी २ टक्के सवलत उद्या म्हणजे १ एप्रिलपासून रदद् करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता घर, जमीन विक्रीसाठी ५ टक्के मुद्रांक शुल्क द्यावे… Continue reading राज्य सरकारकडून आणखी एक झटका : घर, जमीन खरेदी-विक्री आणखी महागली…

बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी व्हन्नूर येथील तिघांना सक्तमजुरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी दोन सख्ख्या भावांसह तिघा तरुणांना तीन वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली. सौरभ संजय बोराटे (वय १९), विशाल संजय बोराटे (वय २०) आणि हृषीकेश संजय हजारे (वय २०, सर्व रा. व्हन्नूर, ता. कागल) अशी या आरोपींची नावे आहेत. या… Continue reading बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी व्हन्नूर येथील तिघांना सक्तमजुरी

शाहू कारखान्याचे आता १५ लाख टन गाळपाचे नियोजन : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शाहू साखर कारखान्याच्या पुढील पाच वर्षाच्या विकासात्मक वाटचालीचे नियोजन तयार आहे. आता कारखान्याचे १५ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट असून त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले. ते आज (बुधवार) कारखान्याच्या ४१ व्या गळीत हंगाम समाप्ती व उच्चांकी ऊस गळीत उद्दिष्टपूर्ती समारंभावेळी बोलत होते. शाहू कारखान्याने या… Continue reading शाहू कारखान्याचे आता १५ लाख टन गाळपाचे नियोजन : समरजितसिंह घाटगे

शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ‘ए ++’ मानांकन प्राप्त

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाला A++ मानांकन प्राप्त झाले आहे. याबाबतची घोषणा राष्ट्रीय मूल्यांकन तथा प्रत्यायन परिषदेने आज (बुधवारी) केली. यामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानचा तुरा खोवला गेला आहे.    बंगळूरमधील नॅकच्या पिअर टीमने विद्यापीठाचे १५ ते १७ मार्च या कालावधीत मूल्यांकन केले होते. संख्यात्मक आणि विश्लेषण या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या मुल्यांकनांत ७० टक्के… Continue reading शिवाजी विद्यापीठाला नॅकचे ‘ए ++’ मानांकन प्राप्त

माजी सैनिकांनी निवृत्ती वेतनासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारत, चीन, पाकिस्तान युध्दात प्रत्यक्ष सहभागी झालेल्या माजी सैनिक, विधवा यांना निवृत्ती वेतन मिळत नाही. त्यांनी कोल्हापूर येथील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात १० एप्रिलपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. माजी सैनिक, विधवा यांनी आपले ओळखपत्र, डिस्चार्ज पुस्तक व युध्दात सहभागी झाल्याप्रित्यर्थ प्रदान केलेल्या नमुद पदकाच्या पुराव्यासह कार्यालयात… Continue reading माजी सैनिकांनी निवृत्ती वेतनासाठी संपर्क साधण्याचे आवाहन

error: Content is protected !!