…म्हणून इमरान हाशमीचा आलिया भट्टसोबत रोमँटिक चित्रपट करण्यास नकार    

मुंबई (प्रतिनिधी) : अभिनेता इमरान हाश्मी यांने एका रोमँटिक चित्रपटामध्ये अभिनेत्री आलिया भट्टसोबत काम करण्यास नकार दिला आहे. यावरून चांगलीच चर्चा रंगली होती. आता इमरान हाश्मीने आलियासोबतच्या चित्रपटाला नकार देण्याचा खुलासा स्वत: केला आहे. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक महेश भट्ट यांचा इमरान हा भाचा आहे. त्यामुळे नात्याने आलिया इमरानची बहिण लागते. त्यामुळे इमरानने आलियासोबत रोमँटिक चित्रपट… Continue reading …म्हणून इमरान हाशमीचा आलिया भट्टसोबत रोमँटिक चित्रपट करण्यास नकार    

अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज (रविवार) सुपूर्द केला. राठोड यांनी पत्नीसोबत वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, अनिल परब, आदित्य ठाकरे आदी प्रमुख नेते उपस्थित होते. सोमवारपासून राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राठोड यांच्यावर… Continue reading अखेर वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा

महापलिका निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर..? : इच्छुकांचा जीव टांगणीला

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोनामुळे महापालिका निवडणुका पुढे जाणार अशी अटकळ बांधली जात होती. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रशासनाच्या या मागणीला शासनाकडून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुका पुन्हा एकदा एक महिना पुढे जाऊ शकतात. त्यामुळे राज्यातील ज्या महापालिकांवर प्रशासक यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांना ३१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. दरम्यान, महापालिका निवडणुका लांबणीवर गेल्यास पुन्हा… Continue reading महापलिका निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर..? : इच्छुकांचा जीव टांगणीला

अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी भाजपची रणनीती : देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

मुंबई (प्रतिनिधी) : सध्याच्या सरकारपेक्षा मोगलाई काय वेगळी आहे काय ? असा प्रश्न करून वनमंत्री संजय राठोड, कोविड काळातील भ्रष्टाचार आदी मुद्द्यांवर विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेरणार असल्याचे संकेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत दिले. राज्याची विस्कटलेली घडी कशी सावरायची हे समजत नसल्याने राज्य… Continue reading अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी भाजपची रणनीती : देवेंद्र फडणवीसांनी दिले संकेत

खच्याक मामांनी अखेरच्या व्हिडिओमध्ये दिला ‘हा’ मौल्यवान संदेश (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ‘नाही तटत… नाही अडत’, असे म्हणत कोल्हापूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या खच्याक मामांनी जाता जाता कोरोनाबाबत एक मौल्यवान संदेश दिला आहे. त्यांचा अखेरचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यांनी मास्कचा वापर केलाच पाहिजे, असे या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात खच्याक मामा उर्फ बाबुराव पाटोळे हे चांगलेच चर्चेत आले… Continue reading खच्याक मामांनी अखेरच्या व्हिडिओमध्ये दिला ‘हा’ मौल्यवान संदेश (व्हिडिओ)

कोल्हापुरात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा

कोल्हापूर (प्रतिनिधी): शहरातील विविध ठिकाणी राबवलेल्या महास्वच्छता अभियानात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९६ वा रविवार होता. शेंडापार्क ते एसएससी बोर्ड, रंकाळा टॉवर ते फुलेवाडी मेनरोड, खानविलकर पंप ते रमनमळा चौक, दसरा चौक ते खानविलकर पंप, टेंबलाईवाडी ब्रिज, लिशा हॉटेल चौक ते कावळा नाका परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्वरा फौंडेशनच्यावतीने रंकाळा परिसरात… Continue reading कोल्हापुरात एक टन कचरा, प्लास्टिक गोळा

भुदरगड तालुक्याचा लौकीक

गारगोटी (प्रतिनिधी) : ऑलंपिक गेम्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व ऑलंपिक गेम्स असोसिएशन, ऑलंपिक जिल्हास्तरीय चँपियनशिप २०२१ च्या वतीने पेठवडगांव (हातकणंगले) येथे घेण्यात आलेल्या ऑलंपिक गेम्समध्ये भुदरगड तालुक्याचे नाव लौकीक केले आहे. ८०० मीटर रनिंग स्पर्धेत प्रज्वल प्रकाश खतकर याने तर लांब उडीत संदेश सोनाळकर यांनी प्रथम क्रमांक मिळवला. साहिल शिवाजी घाटगे याने कबड्डीत उत्कृष्ट कामगिरी… Continue reading भुदरगड तालुक्याचा लौकीक

‘ना चांगभलंचा गजर, ना भाविकांची अलोट गर्दी’ ; जोतिबा डोंगरावर शुकशुकाट

वाडीरत्नागिरी (प्रतिनिधी) : ‘ना चांगभलंचा गजर, ना भाविकांची अलोट गर्दी’, कोरोनामुळे पुन्हा एकदा श्री जोतिबा डोंगर शांत शांत झालाय. श्री क्षेत्र जोतिबाच्या खेट्यांना कोरोनामुळे यंदाही बंदी केल्यामुळे आज (रविवार) पहिल्या खेट्याला जोतिबा डोंगर पूर्णपणे शांत जाणवत होता. दरम्यान, आज पहिल्या खेट्यानिमित्त श्री जोतिबाची खडी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली होती.  जोतिबा डोंगराच्या आजूबाजूच्या ४ किलोमीटर परिक्षेत्रात… Continue reading ‘ना चांगभलंचा गजर, ना भाविकांची अलोट गर्दी’ ; जोतिबा डोंगरावर शुकशुकाट

‘खच्याक मामां’ची चटका लावणारी एक्झिट..! (व्हिडिओ)

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरी भाषा… अस्खलिखित मराठी…  त्याचबरोबर  इंग्रजीतून संवादफेक करून कोल्हापूरकरांना खळखळून हसवणारे संकपाळनगरमधील  लाडके व्यक्तिमत्व बाबुराव पाटोळे (खच्याक मामा) यांचे निधन चटका लावून गेले.  कोल्हापुरात  ते ‘खच्याक मामा’  म्हणून प्रसिद्ध होते. त्याच्या अकाली जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनाची बातमी सोशल मीडियातून प्रसारीत झाल्यानंतर सर्वांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. रांगड्या कोल्हापुरी भाषेतून… Continue reading ‘खच्याक मामां’ची चटका लावणारी एक्झिट..! (व्हिडिओ)

 भाजपला धक्का : मित्रपक्षाची काँग्रेसशी हातमिळवणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मागील काही महिन्यांपासून भाजपप्रणीत एनडीएमधून  मित्रपक्ष  बाहेर पडू लागले आहेत. त्यामुळे भाजपची चिंता वाढली आहे. आता शिवसेना, शिरोमणी अकाली दलापाठोपाठ आसाममधील मित्रपक्ष बोडोलँड पीपल्स फ्रंटने भाजपची साथ सोडत काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. याबाबत पक्षाचे अध्यक्ष हगरामा मोहिलारी यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यामुळे  ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का बसला आहे.… Continue reading  भाजपला धक्का : मित्रपक्षाची काँग्रेसशी हातमिळवणी

error: Content is protected !!