आजपर्यंतच्या इतिहासात ऊसाच्या उच्चांकी गाळपाचा टप्पा पार : समरजितसिंह घाटगे

कागल (प्रतिनिधी) : शाहू कारखान्याने आजपर्यंतच्या इतिहासात ऊसाच्या उच्चांकी गाळपाचा टप्पा पार केला. यापूर्वीच्या हंगामातील स्वतःचा एकूण गळीतचा विक्रम मोडला असून चालू गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये ११२ व्या दिवशी ८ लाख २० हजार मे. टन इतक्या ऊसाचे गाळप करून नवा इतिहास रचला आहे. यामध्ये सभासद, कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे कारखान्याचे चेअरमन समरजितसिंह… Continue reading आजपर्यंतच्या इतिहासात ऊसाच्या उच्चांकी गाळपाचा टप्पा पार : समरजितसिंह घाटगे

इचलकरंजी येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणावरुन एकास मारहाण : चौघांना अटक

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणातून काल (शनिवार) रात्री एकावर खुनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात रमजान सय्यद शेख (वय ४१, रा. आसरानगर, इचलकरंजी) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी महेश घारुंगे, आकाश घारुंगे, सनी माछरे या तिघांना अटक केली असून एका अल्पवयीन… Continue reading इचलकरंजी येथे प्रेमविवाह केल्याच्या कारणावरुन एकास मारहाण : चौघांना अटक

‘समृद्धी’ महिला सक्षमीकरण अभियान राबविणार : ना. हसन मुश्रीफ

कागल (प्रतिनिधी) : येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार. अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. तसेच महिला अबला नाहीत, त्या सबला आहेत. यापुढे त्यांना अजून सक्षम करण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. कागल पंचायत समितीच्या आवारात महिला स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंच्या विक्री केंद्राच्या… Continue reading ‘समृद्धी’ महिला सक्षमीकरण अभियान राबविणार : ना. हसन मुश्रीफ

गांधीनगरमध्ये बनावट लेबल लावून विक्री करणाऱ्या जीन्सच्या दुकानावर छापा…

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मचमोअर गारमेन्ट या दुकानात लेविस या कंपनीचे बनावट लेबल विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ८ लाखांच्या बनावट जीन्स पॅन्ट आज (रविवार) जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दुकानाचे मालक सुमित लक्ष्मणदास तलरेजा (वय २७, रा. गांधीनगर) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद नेत्रिका कन्सल्टींगचे सुब्रमण्यम व्यंकटेश (वय ४२… Continue reading गांधीनगरमध्ये बनावट लेबल लावून विक्री करणाऱ्या जीन्सच्या दुकानावर छापा…

कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ४४ जणांना कोरोनाची लागण

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात ४४ जण कोरोना बाधित झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर आज (रविवार) दिवसभरात ५ जण झाले कोरोनामुक्त झाले आहेत. १९४८ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कोल्हापूर शहरातील ३३, आजरा तालुक्यातील १, गडहिंग्लज तालुक्यातील १, हातकणंगले तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील… Continue reading कोल्हापूर कोरोना अपडेट : जिल्ह्यात चोवीस तासात ४४ जणांना कोरोनाची लागण

‘मनोरा’ हॉटेलला बदनाम करण्याचे कारस्थान : हॉटेल व्यवस्थापन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काल (रविवार) मनोरा हॉटेल येथे जेवणामध्ये पाल सापडल्याचे सांगत काही तरुणांनी हॉटेलमध्ये हुज्जत घातली होती. यावर मनोरा हॉटेलच्या व्यवस्थापनाने आमच्या हॉटेलमध्ये जेवणात पाल सापडल्याच्या बहाणा करुन कांगावा निर्माण करण्याचा प्रयत्न काही तरुणांनी केला. त्यामुळे विनाकारण आमच्या हॉटेलला बदनाम करण्याचे कारस्थान होत असल्याचे सांगितले. तसेच गेली दहा वर्षे आम्ही कोल्हापूरकरांना सेवा देत आहोत.… Continue reading ‘मनोरा’ हॉटेलला बदनाम करण्याचे कारस्थान : हॉटेल व्यवस्थापन

श्री काळभैरीची पालखी पोलीस संरक्षणात डोंगराकडे रवाना (व्हिडिओ)

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गडहिंग्लजमधील उद्या होणारी श्री काळभैरीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत श्री काळभैरीची पालखी पोलीस संरक्षणात डोंगराकडे रवाना करण्यात आली. त्यामुळे यंदाच्या वर्षी ना चांगभलंचा गजर ना गुलालाची उधळण होणार आहे.  

चंदगडमध्ये भाजपला धक्का : गोपाळराव पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कोल्हापूर (प्रतिनिधी) : चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांनी आज (रविवार) आपल्या निवडक कार्यकर्त्यासह पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम झाला. दौलत साखर कारखान्याचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील यांचा एक मोठा गट चंदगड विधानसभा मतदार संघात कार्यरत आहे. २००९ च्या… Continue reading चंदगडमध्ये भाजपला धक्का : गोपाळराव पाटलांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

बाबूरावांना व्हायचं होतं डॉक्टर, पण झाले ‘खच्याक मामा’..! 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील निगवे येथे आई-वडिलांसह बाबू आणि त्यांचे ४ बंधू राहत होते. मिळेल ते काम करुन पोटाची खळगी भरत हे कुटुंब उदरनिर्वाह करत होते. इयत्ता चौथीच्या स्कॉलरशीप परीक्षेत बाबू राज्यात पहिला आला. घरची परिस्थिती नसल्याने शिक्षकांनी बाबूला सातार्‍यातील शासकीय शाळेत घातले. तेथून दहावी झाल्यानंतर बाबूने गोखले कॉलेजमधून बारावी सायन्स केले. आता आपले… Continue reading बाबूरावांना व्हायचं होतं डॉक्टर, पण झाले ‘खच्याक मामा’..! 

वनमंत्री पदासाठी शिवसेनेत लॉबिंग..? : ‘या’ नावांची चर्चा

मुंबई (प्रतिनिधी) : अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. त्यानंतर आता मंत्रिपद मिळवण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांचे लॉबिंग सुरू झाले आहे. वनमंत्रीपदासाठी आता शिवसेना आमदारांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती देऊन विदर्भात राज्यमंत्री पद दिले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  दरम्यान, विदर्भातील… Continue reading वनमंत्री पदासाठी शिवसेनेत लॉबिंग..? : ‘या’ नावांची चर्चा

error: Content is protected !!