शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचे आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचे आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी  प्रजासत्ताक दिनी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला,… Continue reading शेतकरी आंदोलनावर पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’

एकाच महिन्यात दोनवेळा ‘संकष्टी चतुर्थी’चा योग..!

मुंबई (प्रतिनिधी) : नवीन वर्षातील दुसरी संकष्टी चतुर्थी आज (३१ जानेवारी) आहे. जानेवारी महिन्यात दोन संकष्टी चतुर्थीचा योग आला आहे. पहिली संकष्टी चतुर्थी २ जानेवारीला होती. तर दुसरी चतुर्थी आज ३१ जानेवारीला आहे. त्यामुळे गणेशभक्तांसाठी पर्वणी असणार आहे. सामान्यपणे संकष्टी चतुर्थीला गणेश भक्त मंदिरामध्ये गणपतीचे दर्शन घेतात. तर काही जण या दिवशी उपवास ठेवतात. कोरोना… Continue reading एकाच महिन्यात दोनवेळा ‘संकष्टी चतुर्थी’चा योग..!

खंडणीप्रकरणी भाजप नेत्याच्या पुत्राची चौकशी  

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांना मुलुंड पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. एका जुन्या खंडणीप्रकरणी नील सोमय्या यांनी पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. तसेच मुलुंड पोलिसांकडून नील सोमय्या यांचा या गुन्हासंदर्भात जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जवळपास… Continue reading खंडणीप्रकरणी भाजप नेत्याच्या पुत्राची चौकशी  

खिलार बैलाला ‘इनोव्हा’ इतकी किंमत..!

सांगली (प्रतिनिधी) : लॉकडाऊननंतर पहिल्यांदाच सांगली जिल्ह्यातील खरसुंडीत बैल बाजार भरला आहे. येथे बैल खरेदी करण्यासाठी पशूपालकांची झुंबड उडाली आहे. विशेष म्हणजे या बाजारात जातीवंत बैल विक्रीसाठी आले असून त्याला मोठी किंमतही लागली आहे. एका खिलार बैलाला इनोव्हा एवढी किंमत आल्याने सध्या खुरसुंडीचा खिल्लार जनावर बाजार चर्चेत आला आहे. यात्रेमध्ये १६ लाख रुपये किमतीचा बैल… Continue reading खिलार बैलाला ‘इनोव्हा’ इतकी किंमत..!

प्रख्यात गझलकार इलाही जमादार यांचे निधन

सांगली (प्रतिनिधी) : सुप्रसिद्ध गझलकार आणि महाकवी म्हणून ओळख असलेले इलाही जमादार यांचे आज सकाळी (रविवार) निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. सांगली जिल्ह्यातील दुधगाव या त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. इलाही जमादार यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात गझलेला पोसले. आपल्या समृद्ध लेखनीतून त्यांनी एकापेक्षा एक अशा गझल दिल्या. मराठ, हिंदी आणि… Continue reading प्रख्यात गझलकार इलाही जमादार यांचे निधन

लोक सहभागातून केलेल्या कामामध्ये जिवंतपणा येतो : जिल्हाधिकारी

कोतोली (प्रतिनिधी) :  लोकांनी मनावर घेतले  तर काय बदल घडू शकतो. हे कोतोली येथे लोकसहभागातून तलाठी कार्यालय उभारून लोकांनी दाखवून दिले आहे. शासकीय किंवा इतर कामात लोकांचा सहभाग असेल, तर त्यामध्ये जिवंतपणा येतो, त्यामुळे त्याचा लाभ सर्वांना घेता येतो, असे  प्रतिपादन जिल्हाधिकारी दौलत देसाई  यांनी केले. कोतोली  (ता.पन्हाळा) येथे लोकसहभागातून तब्बल १७ लाखांचे तलाठी कार्यालय… Continue reading लोक सहभागातून केलेल्या कामामध्ये जिवंतपणा येतो : जिल्हाधिकारी

यड्राव येथे विकासकामांचे उद्घाटन    

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्रावमधील प्रभाग क्रमांक २ मध्ये नांदणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या स्वनिधीतून बोअर मारण्यात आली. नुकत्याच झालेल्या ग्रा.पं. निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक २ मध्ये बोअर मारून देण्याचे आश्वासन राजवर्धन निंबाळकर यांनी दिले होते.  त्या आश्वासनाची पूर्तता तत्काळ केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.   याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक… Continue reading यड्राव येथे विकासकामांचे उद्घाटन    

अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मी ज्याप्रमाणे अरविंदला पाठिंबा दिला होता. त्याच विश्वासाने मी अण्णा हजारे यांचे समर्थन केले होते. पण अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक होती. मला याचं दुःख नाही आहे. कारण आपण सगळेच चुका करतो. मीसुद्धा ‘सिमरन’ सिनेमा केला होता, असे ट्विट करत बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी आपली प्रतिक्रिया दिली… Continue reading अण्णा हजारेंना समर्थन देणं ही माझी चूक..!

…यांच्यापुढे काय डोकं फोडून घ्यायचं का ? : अजित पवार

अहमदनगर (प्रतिनिधी) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अनेक नागरिक मास्क न लावता आले होते. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी फिरत होते.  या नागरिकांना  अजित पवारांनी चांगलेच फैलावर घेतले.    व्यासपीठावरून बोलताना मास्क न लावलेल्या नागरिकांबाबत  अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. हे बघा पठ्ठे… Continue reading …यांच्यापुढे काय डोकं फोडून घ्यायचं का ? : अजित पवार

यड्राव येथे जवानाच्या हस्ते ‘पल्स पोलिओ’ लसीकरण  

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यड्राव येथे  पल्स पोलिओ लसीकरण शिबिराला आज (रविवारी) सकाळी सुरुवात झाली. या शिबिराचे उद्‌घाटन बीएसएफ  जवान विनायक लवाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्यसेविका भाटे, आरोग्यसेवक किरण एरंडोले,  लीना बाबर,  मदतनीस वनिता रेंडाळे,  आशाराणी कोळी आदी उपस्थित होत्या. सकाळी ७ वाजल्यापासून ते संध्याकाळी ५  वाजेपर्यंत हे अभियान चालू असणार आहे. आरोग्य केंद्र,… Continue reading यड्राव येथे जवानाच्या हस्ते ‘पल्स पोलिओ’ लसीकरण  

error: Content is protected !!